Join us

मलायका अरोराची कोरोनावर मात; 15 दिवसांत अशी झाली अवस्था

By रूपाली मुधोळकर | Published: September 20, 2020 6:21 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहे.
2 / 10
आपल्या सोशल मीडियावर तिने ही आनंदाची बातमी शेअर केली. सोबत 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचा अनुभवही शेअर केला.
3 / 10
मलायकाने इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायकाच्या चेह-यावर मास्क आणि हातात कॉफी मग आहे.
4 / 10
या फोटोसोबत मलायकाने पोस्ट लिहिली आहे. अखेर मी माझ्या खोलीतून कित्येक दिवसांनंतर बाहेर आले. हे म्हणजे, स्वत:मध्येच एक प्रवास केल्यासारखे आहे. कमीत कमी वेदना आणि समस्यांसह मी या व्हायरसवर मात केली,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले.
5 / 10
वैद्यकीय सल्ला देणारे डॉक्टर्स, वारंवार मार्गदर्शन करणारी बीएमसी आणि मला आधार देणारे माझे कुटुंब या सर्वांचे मी आभार मानते. माज्या या वाईट परिस्थितीत तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जे केले, त्यासाठी मी शब्दातही धन्यवाद नाही मानू शकत. तुम्ही सर्व सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या,, असेही मलायका म्हणाली.
6 / 10
बॉयफ्रेंड अर्जुन कपूरपाठोपाठ मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. 6 सप्टेंबरला तिला कोरोनाचे निदान झाले होते.
7 / 10
7 सप्टेंबरला तिने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते.
8 / 10
मलायका अरोराचा शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’च्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित झाले होते, त्यानंतर मलायकाचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
9 / 10
मलायकामध्ये लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे ती होम क्वारंटाइन होती. घरीच तिच्यावर उपचार सुरू होते.
10 / 10
मलायकासोबत तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर याचा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह आला होता.
टॅग्स :मलायका अरोरा