Malaika Arora : ब्रेकअप के बाद! मालदीव्सला गेली मलायका, नेटकरी म्हणाले- "अर्जुन कुठे आहे?" By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:22 AM1 / 7मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल...पण, गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुन यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 2 / 7मलायका आणि अर्जुन दोघांनी याबाबत क्रिप्टिक पोस्टही शेअर केल्या होत्या. पण, ब्रेकअपबाबत उघडपणे बोलणं त्या दोघांनीही टाळलं होतं. 3 / 7अशातच मलायकाला मिस्ट्री मॅनबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानच आता मलायका मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. 4 / 7मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मालदीव्स व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 5 / 7फोटोमध्ये मलायका बाथरोब ड्रेसमध्ये समुद्रकिनारी बसून एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 6 / 7तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अर्जुन कपूर असं लिहिलं आहे. अनेकांनी 'अर्जुन कपूर कुठे आहे?' असंदेखील विचारलं आहे. 7 / 7गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसायचे. आणखी वाचा Subscribe to Notifications