हॅपी बर्थ डे मनीषा कोईराला...! पाहा, ‘इलू इलू गर्ल’चे कधीही न पाहिलेले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 2:21 PM1 / 12अभिनेत्री मनीषा कोइरालाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.2 / 12१९९१ मध्ये सौदागर या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणा-या मनीषाचा हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता.3 / 12‘सौदागर’नंतर मनीषाने अनेक हिट सिनेमे दिलेत आणि बघता बघता बॉलिवूडच्या टॉप टेन अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविले.4 / 12छोटीशी लव्ह स्टोरी, अकेले हम अकेले तूम, अग्निसाक्षी, दिल से, लज्जा आणि मन यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्या नावावर आहेत.5 / 12अर्थात करिअरचा हा यशस्वी प्रवास ती पुढे कायम ठेवू शकली नाही. मनीषाच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर देखील झाला. त्यामुळे ती अनेक वाईट सवयींच्या आहारीदेखील गेली.6 / 12करिअरच्या एका वळणार मराठमोळा अभिनेता नाना पाटेकरसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्यात.7 / 12नाना पाटेकर आणि मनीषाने ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटात मनिषा कोईराला सोबत काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. 8 / 12 ते दोघे लग्न देखील करणार होते. मनिषा आयुष्यात येण्याआधी नाना यांचे लग्न झालेले होते. पण नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला.9 / 12पुढे मनीषाने सम्राट दहल नावाच्या एका नेपाळी बिझनेसमॅन लग्नगाठ बांधली. मनीषा आणि सम्राट हे पहिल्यांदा फेसबुकच्या माध्यमातून भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले. 10 / 12अर्थात मनीषाचे लग्न फार काळ टिकले नाही. २०१२ मध्ये तिने पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर एका मुलाखतीत मनीषाने म्हटले होते की, ‘माझ्या घटस्फोटासाठी मी स्वत: जबाबदार आहे. जर तुमच्या नात्यात गोडवा नसेल तर तुम्ही विभक्त होणे अधिक योग्य असते.’ 11 / 12२०१२ दरम्यान मनीषाला कर्करोग झाला. मनीषाने जिद्दीने कॅन्सरला परतवून लावले.12 / 12कॅन्सरला मात देणारी मनीषा आजही बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications