Join us

"मला समजत नाही की असं का होतं?, महिन्यातून एकदा..."; अभिनेत्रीला होताहेत प्रचंड वेदना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 4:46 PM

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करत असते. आता लेटेस्ट पोस्टमध्ये तिने, ती डोकेदुखीच्या समस्येने खूप त्रस्त असल्याचं चाहत्यांना सांगितलं.
2 / 11
मनीषाने चाहत्यांना या समस्येतून सुटका करण्यासाठी उपायही विचारला आहे. तसेच सल्लाही दिला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती बेडवर आराम करताना दिसत आहे.
3 / 11
अभिनेत्रीने सांगितलं की, तिला महिन्यातून एकदा तीव्र डोकेदुखी होते आणि त्याचे कारण काय आहे हे तिला माहीत नाही. तिच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.
4 / 11
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'डोकेदुखीशी संबंधित समस्या, नमस्कार मित्रांनो! आज मी काही वैयक्तिक गोष्टी शेअर करत आहे आणि मला आशा आहे की तुमच्यापैकी काहींना ते आवडेल.'
5 / 11
'मला महिन्यातून एकदा तीव्र डोकेदुखी होते आणि मला समजत नाही की असं नेमकं का होतं? हे पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा झोपेची कमतरता, खराब आहार किंवा तणावामुळे होतं का? की ही सर्व कारणं आहेत?'
6 / 11
यानंतर मनीषा कोईरालाने काही गोष्टी लिहिल्या, 'माझा उपाय? एक किंवा दोन दिवस सर्वकाही थांबवणं, आरामशीर ऑडिओबुक किंवा संगीत ऐकणं, हलका आहार, भरपूर पाणी पिणं आणि औषधे घेणं.'
7 / 11
'तुम्हाला कोणाला हा अनुभव आला आहे का? तुम्ही याचा कसा सामना करता? तुमच्या टिप्स आणि उपाय शेअर केल्याने मला आणि इतरांनाही आराम मिळू शकतो.'
8 / 11
२०१२ मध्ये अभिनेत्रीला ओव्हरियन कँन्सरचं निदान झालं. अभिनेत्री म्हणाली, 'मला माझा आवाज केवळ कॅन्सरच्या रुग्णांना मदत करण्यासाठीच नाही तर आरोग्य सेवेची गरज आणि कॅन्सरचे संकेत, लक्षणांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी वापरायचा आहे.'
9 / 11
'स्वतः कॅन्सरचा सामना केल्याने, हा प्रवास किती आव्हानात्मक असू शकतो हे मला माहीत आहे आणि मला विश्वास आहे की, आपण सर्वांनी पुढे येऊन इतरांना मदत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे'
10 / 11
मनीषा कोईराला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या सीरिजमध्ये 'मल्लिकाजान'च्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भुमिकेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
11 / 11
टॅग्स :मनिषा कोईरालाबॉलिवूडकर्करोग