Join us

लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 2:17 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
2 / 8
सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यात कागर, आठवा रंग प्रेमाचा, मेकअप अशा अनेक सिनेमांचा त्यात समावेश आहे.
3 / 8
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 8
रिंकूचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
5 / 8
रिंकूने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 8
रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिची आई तिच्यासाठी सर्व काही आहे असंही तिने या पोस्टमधून सांगितलं आहे.
7 / 8
रिंकू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, तिची आई अत्यंत साधेपणाने राहते.
8 / 8
रिंकू अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या आईचा उल्लेख करत असते. यात ती तिच्या आईच्या हातच्या जेवणाचं खूप कौतुक करतांना दिसते. रिंकूची हुबेहूब तिच्या आईसारखी दिसत असून अनेकांनी या मायलेकींचं कौतुक केलं आहे.
टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमाजागतिक महिला दिन