Join us

Mirzapur 2: युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे गुड्डू आणि कालीन भैयाच्या 'मिर्झापूर २'चा ट्रेलर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 16:13 IST

1 / 8
चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि पुन्हा एकदा मिर्झापूर २चा ट्रेलर रिलीज झाला आहे. (फोटो: यूट्यूब)
2 / 8
मिर्झापूर २चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या सीझननंतर चाहते सीझन २ची उत्सुकतेने वाट पाहत होते. (फोटो: यूट्यूब)
3 / 8
आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात सर्व कलाकार मागील सीझनप्रमाणे दमदार अंदाजात पहायला मिळत आहेत. (फोटो: यूट्यूब)
4 / 8
मिर्झापूर २मध्ये प्रतिशोध, षडयंत्र, ड्रामा आणि नारी शक्तींच्या माध्यमातून नवीन कथा पहायला मिळणार आहे. नवीन कथेत बंदुक, ड्रग्स आणि अधर्माचे वाईट जग कथानकात आणखीन इंटेस होत जाते. (फोटो: यूट्यूब)
5 / 8
मागील सीझनमध्ये दाखवले होते की कालीन भैया (पंकज त्रिपाठी)चा मुलगा मुन्ना (दिव्येंदु शर्मा) बदला घेण्यासाठी बबलू पंडित (विक्रांत मेस्सी) आणि श्रिया पिळगावकरच्या पात्राला मारतात.(फोटो: यूट्यूब)
6 / 8
यावेळी गुड्डू पंडीत (अली फजल) आणि गोलू (श्वेता त्रिपाठी) कालीन भैयाचा बदला आणि मिर्झापूर घेण्यासाठी परत आले आहेत. (फोटो: यूट्यूब)
7 / 8
ट्रेलरमध्ये स्पष्ट दाखवण्यात आले आहे की गुड्डू आणि गोलू मिळून कालीन भैया आणि मुन्नाचा बदला घेणार. यासोबतच रसिका दुग्गल सुसरच्या जवळ येत आहे. तर मुन्नादेखील कालीनचे नियम तोडताना दिसणार आहे. संपूर्ण ट्रेलर बदल्यावर आधारीत आहे. (फोटो: यूट्यूब)
8 / 8
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीअली फजलविक्रांत मेसीश्वेता त्रिपाठीश्रिया पिळगावकर