Join us  

Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 5:34 PM

1 / 10
मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. तब्बल ३५० चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
2 / 10
पण तुम्हाला माहीत आहे का... मिथुन चक्रवर्ती हे ज्या यशापर्यंत पोहोचले आहेत तो प्रवास सोपा नव्हता. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खूप संघर्ष करावा लागला.
3 / 10
कामाच्या शोधात कोलकाता सोडून मिथुन यांनी मुंबई गाठली तेव्हा ते अनेक महिने बेरोजगार होते. दिवसातून दोन वेळा जेवण मिळणं देखील अवघड झालं होतं.
4 / 10
एका मुलाखतीत मिथुन यांनी म्हटलं होतं की, 'मी असे दिवस देखील पाहिले आहेत जेव्हा मला माहीत नव्हतं की पुढचं जेवण काय असेल, मी कुठे झोपणार आहे?, मी बरेच दिवस फूटपाथवर झोपलो.'
5 / 10
'लुक आणि स्किनमुळे अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. अपमान करण्यात आला. माझ्याकडे मुंबईत राहण्यासाठी स्वत:चं घर नव्हतं.'
6 / 10
एक वेळ अशी आली की, ते इमारतींच्या गच्चीवर आणि पाण्याच्या टाक्यांवर झोपायचे. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत, संघर्षाच्या दिवसात ते आत्महत्येचा विचार करत असल्याचं देखील सांगितलं आहे.
7 / 10
'हुनरबाज' या रिॲलिटी शोमध्ये मिथुन यांनी सांगितलं होतं की, ते एकेकाळी पार्ट्यांमध्ये डान्स करून पोट भरायचे. जेणेकरून मला एक वेळचं जेवण मिळेल. पैसे वाचवण्यासाठी पायी चालत जायचे.
8 / 10
अनेक महिने वाट पाहिल्यानंतर त्यांना हेलनचा असिस्टेंट बनण्याची संधी मिळाली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, ते चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसले. मिथुन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'दो अनजाने' चित्रपटात छोटी भूमिका केली होती.
9 / 10
'मृगया' या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'डिस्को डान्सर' या चित्रपटाने त्यांच्या करिअरला नवं वळण दिलं. नॉन डान्सर असूनही मिथुन यांनी चांगलं परफॉर्म केलं.
10 / 10
टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड