संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 6:23 PM1 / 8बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. एकेकाळी तो ड्रग्सच्या आहारी गेला होता. या वाईट व्यसनामुळे तो विषारी बनला होता.2 / 8संजय दत्तने कलर्स वाहिनीच्या शोमध्ये एंटरटेन्मेंट की रातमध्ये खुलासा केला होता की, एक काळ असा होता जेव्हा त्याला मच्छर चावली की ती मरून पडत होती.3 / 8हे पाहून संजय दत्त खूप हैराण झाला होता. तो म्हणाला होता की, त्याचे रक्त पिऊन मच्छर उडू शकत नव्हते आणि ते मरून पडायचे.4 / 8संजय दत्त म्हणाला होता की, डॉक्टरांनी त्याला संकेत दिले होते की, त्याच्या रक्तातील विषाचे प्रमाण वाढले आहे.5 / 8संजय दत्तला देखील या गोष्टीची जाणीव झाली होती की, त्याच्यासाठी ही धोक्याची घटना आहे.6 / 8संजय दत्त म्हणाला की, त्यानंतर तो ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागला होता.7 / 8संजय दत्तचं म्हणणं होतं की असे ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे होत होते. 8 / 8मात्र जसेजसे तो ड्रग्समधून बाहेर पडू लागला तेव्हा मच्छरांचे मरणेदेखील कमी झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications