Join us  

बॉलिवूड-साऊथ इंडस्ट्री मिळून गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 4:48 PM

1 / 10
प्रेक्षक हे रूपेरी पडद्यावर त्याच त्या कलाकारांच्या जोड्या बघून आपण कंटाळले आहेत. त्यामुळे 'पैसा वसूल' चित्रपट बनवण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक मंडळी बॉलिवूड तसेच साऊथच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवताना दिसत आहेत.
2 / 10
ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी : याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच लाँच झालेली 'देवरा' चित्रपटातील साऊथचा स्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांची जोडी(Janhvi Kapoor and jr ntr). बॉलिवूड-साऊथ असा मेळ बसवत वीकेंड ‘कॅश’ करण्यासाठी ही भन्नाट आयडिया तयार करण्यात आली आहे.
3 / 10
राम-कियारा : कियारा अडवाणी आणि रामचरण यांची जोडी 'गेमचेंजर'मध्ये (Kiara Advani and Ram Charan Game Changer) पाहायला मिळणार आहे. लवकरच 'गेमचेंजर' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं असून लवकच रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे.
4 / 10
रणबीर-साई पल्लवी : यासाेबतच 'रामायण'मधून रणबीर-साई पल्लवी हे (Ranbir Kapoor Sai Pallavi in Ramayana) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
5 / 10
विकी-रश्मिका : 'छावा : द ग्रेट वॉरियर' (Chhava : The Great Warrior) मध्ये विकी-रश्मिका (Vicky Kaushal Rashmika Mandanna) ही जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल.
6 / 10
रणबीर-रश्मिका : याशिवाय, काही सिनेमे हे आधिच प्रदर्शित झालेले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. यातली लेटेस्ट जोडी म्हणजे रणबीर व रश्मिका. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिकाची (Rashmika Mandanna and Ranbir Kapoor Animal) केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. २०२३ चा सर्वांत जास्त कमाई करणारा हा ‘ए’ रेटेड चित्रपट ठरला.
7 / 10
शाहरूख-नयनतारा : ७ सप्टेंबर २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'जवान' या ॲक्शन-थ्रिलरपटात बॉलिवूड किंग शाहरूख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Shahrukh Khan-Nayantara) हे मुख्य भूमिकेत दिसले. यातील शाहरूख-नयनताराची जोडी प्रेक्षकांना भावली.
8 / 10
रामचरण-आलिया : २५ मार्च २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'आरआरआर' या चित्रपटात साऊथचा स्टार रामचरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. रामचरण आणि आलियाची ( Alia Bhatt-ram charan in RRR ) जोडी प्रेक्षकांना भावली. ५५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल १,३८९.३१ कोटींची कमाई केली.
9 / 10
धनुष-सोनम : २१ जून २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या 'रांझणा' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Dhanush & Sonam Kapoor Raanjhanaa) यांची जोडी जमली होती. आनंद एल.राय दिग्दर्शित या चित्रपटात कुंदन आणि झोयाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. यातील 'तुम तक', 'बनारसीया' अशी गाणी प्रसिद्ध झाली.
10 / 10
रजनीकांत-ऐश्वर्या : १ ऑक्टोबर २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'रोबोट' चित्रपटात साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन (Superstar Rajnikanth-AIshwarya Rai in Robot) यांची जोडी जमली. सायन्स फिक्शन ॲक्शन आधारित हा चित्रपट असून ही अनोखी जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटाने १५० कोटींच्या बजेटमध्ये ३२० कोटींची कमाई केली. दोन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर ॲवॉर्डस, दोन स्क्रिन ॲवॉर्डस जिंकले.
टॅग्स :सिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीTollywoodराम चरण तेजाकियारा अडवाणीजान्हवी कपूरसाई पल्लवीरश्मिका मंदानारणबीर कपूरविकी कौशलऐश्वर्या राय बच्चनशाहरुख खानधनुष