सुपर स्टायलिश मौनी रॉयने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 06:54 PM2022-05-06T18:54:39+5:302022-05-06T18:54:39+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि सुपर स्टायलिश अभिनेत्री म्हणून मौनी रॉयची ओळख आहे. अभिनयासोबतच कथ्थक नृत्याचे धडे घेणारी मौनी एक उत्तम गायिकादेखील आहे. (Photo instagram)

छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मौनीचा जन्म पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे झाला आहे. मौनीचे आई-वडीलदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. (Photo Instagram)

कूच बिहारमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या मौनीने तिचं पुढील शिक्षण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे केलं. मात्र, अर्ध्यावर शिक्षण सोडून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. (Photo Instagram)

'रन' चित्रपटात तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. . (Photo Instagram)

त्यानंतर 'देवों के देव महादेव' या मालिकेत झळकल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. त्याचबरोबर तिचा लूकदेखील दिवसेंदिवस बदलल्याचं पाहायला मिळालं.(Photo Instagram)

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(Photo Instagram)

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)