Aryan Khan Drug Case : यामुळे शाहरुख खाननं आपल्या लाडक्या मुलाचं नाव ठेवलं 'आर्यन', मुलीशी आहे कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:32 PM1 / 10बॉलिउडच्या ग्लॅमरस दुनियेतील स्टार शाहरुख खानचा नेहमीच वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न असतो. पण शाहरुख खानला काय माहित होते, की एक दिवस त्याच्याच मुलावर तुरुंगात जाण्याची वेळ येईल. खरे तर, गेल्या 2 ऑक्टोबरला एनसीबीने आर्यनसह 17 जणांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक केली आहे.2 / 10आपला लाडका मुलगा आर्यनच ड्रग्स प्रकरणात अडकल्याने, शाहरुख आणि गौरी खान यांच्यासाठी प्रत्येक क्षण नक्कीच अवघड जात असावा. शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले होते, की तो त्याच्या पत्नीनंतर सर्वाधिक प्रेम कुणावर करत असेल, तर ती त्याची मुले आहे. यामुळेच, त्याच्या मुलाला तुरुंगाची हवा खाताना पाहणे, त्याला अत्यंत कठीण जात असेल. पण, शाहरुखने आपल्या मुलाचे नाव आर्यन का ठेवले, हे तुम्हाला माहित आहे? जर माहीत नसेल, तर जाणून घ्या शाहरुख आणि आर्यनच्या जीवनाशी संबंधित हा खास किस्सा...3 / 10लग्नानंतर 7 वर्षांनी झाला आर्यन - शाहरुख खान आणि गौरी यांनी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. ज्यांचे नाव त्यांनी आर्यन, असे ठेवले. मुलाचे नाव आर्यन ठेवण्यामागे कुठलेही ज्योतिषशास्त्र नाही, तर या नावाचे कनेक्शन मुलींशी होते.4 / 10म्हणन शाहरुखने मुलाचे नाव ठेवले 'आर्यन' - शाहरुखने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते, की आर्यनचा लुक आम्हा दोहोंसारखा आहे. मी विचार केला, की आमच्या मुलाचे नाव आर्यन का ठेवू नये? मला केवळ नावाचा उच्चार आवडला होता. मला वाटले, जेव्हा तो एखाद्या मुलीला 'माझे नाव आर्यन', आर्यन खान आहे, असे सांगेल... तेव्हा ते ऐकायला छान वाटेल.5 / 10आर्यनच्या जन्मावेळी काय विचार करत होता शाहरुख? - एका चॅट शोमध्ये शाहरुखने खुलासा केला होता, की आर्यनच्या जन्मावेळी तो, त्या दोघांजवळ नाही, असा विचार करत होता. माझ्या मनात केवळ एकच गोष्ट सुरू होती, की गौरी ठीक असावी, तिला काही होऊ नये. तथापि, जेव्हा दोघांना पाहिले तेव्हा बरे वाटले, असेही शाहरुख म्हणाला होता.6 / 10आर्यन 2 ऑक्टोबरपासून कारागृहात - आर्यन खानला 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून एनसीबीने अटक केली. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. कारागृहात आर्यन व्यवस्थित खात-पीतही नाही. 7 / 10कारागृहात अशा स्थितीत राहतोय आर्यन - आर्थर रोड कारागृहातून नुकतीच सुटका झालेला एक कैदी श्रवण नडारने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, आर्यन आणि त्याच्या साथीदारांना त्यांचे क्वारंटाईन संपल्यानंतर, बॅरेक नंबर 1 मध्ये आणण्यात आले. एका बॅरेकमध्ये 4 सेल आहेत आणि एका सेलमध्ये 100 कैदी असतात. म्हणजेच 4 सेलमध्ये 400 कैदी. 8 / 10येथे सर्व जण येथे शेजारी-शेजारीच झोपतात. हालचाल करायलाही त्रास होतो. एका सेलमध्ये 4 स्वच्छतागृहे आहेत. यात एक पाश्चिमात्य तर 3 भारतीय प्रकारचे आहेत. आर्यनच्या कोठडीत 100 कैदी आणि 10 पंखे आहेत.9 / 10आर्यन आपलं अन्न इतर कैद्यांना देतो - श्रवणने सांगितले, आर्यनने पहिल्याच दिवशी जेलचा चहा घेतला. त्याला तो चहा मीच दिला होता. याशिवाय त्याने काहीही खालले नाही. तो कॅन्टीनमधून बिस्किट्स, चिप्स मागवतो. बिस्किट्स पाण्यात बुडवून खातो आणि बाटलीबंद पाणीच घेतो. मी अनेक वेळा पाहिले आहे. 10 / 10श्रवण म्हणाला, कारागृहाच्या नियमांप्रमाणे, आपल्या वाट्याचे अन्न घ्यावेच लागते. आर्यन त्याच्या वाटाच्या अन्न घेतो, पण तो ते इतर कैद्यांना देऊन टाकतो. मी आणि कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याला विचारले, पण तो केवळ, इच्छा नाही, भूक नाही, असे म्हणतो. तो एकटाच असतो. कुणाहीशी बोलत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications