Join us

Mumbai Drug Case: ड्रग्स प्रकरणात Bollywood मधील या कलाकारांकडून Sameer Wankhede यांनी उकळले कोट्यवधी रुपये, NCB अधिकाऱ्याच्या त्या निनावी पत्रात नावानिशी उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:06 PM

1 / 8
राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेले निनावी पत्र प्रसिद्ध केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यामधून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
2 / 8
समीर वानखेडे यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांना ड्रग्सच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
3 / 8
या पत्रात एनसीबीचा अधिकारी म्हणतो की, एनसीबीचे आधीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडे यांना अमित शाहांना सांगून नियमबाह्य पद्धतीने झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केले. तसेच समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना बॉलिवूडला सर्व मार्ग अवलंबून ड्र्ग्सच्या प्रकरणात अडकवण्याचे आदेश दिले.
4 / 8
समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना खोट्या केसमध्ये अडकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांनाही त्यांचा वाटा दिला गेला, असा आरोप एनसीबीच्या या अधिकाऱ्याने केला आहे.
5 / 8
बॉलिवूडमधील दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूलप्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल यांच्याकडून हे कोट्यवधी रुपये त्यांचा वकील अयाज खान याने गोळा करून दिले, असा दावा करण्यात आला आहे.
6 / 8
अयाज खान याची मैत्री समीर वानखेडे यांच्याशी असून, ते एनसीबीच्या कार्यालयात मुक्तसंचार करत असतात. ते बॉलिवूडमधून समीर वानखेडे यांना मासिक वसुली करून देतात. त्याबदल्यात समीर वानखेडे जेव्हा कुठल्याही बॉलिवूड कलाकाराला पकडतात तेव्हा त्यांच्यावर अयाज खान यांना वकील करण्यासाठी सांगतात, असा दावाही या पत्रामधून करण्यात आला आहे.
7 / 8
दरम्यान, या पत्रामधून एनसीबीच्या अधिकाऱ्याने समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
8 / 8
बनावट केस उभ्या करण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक टीम उभी केली आहे. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोबॉलिवूडमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी