मुन्नाभाई MBBS @ 17 : आता अशी दिसते संजय दत्तची हिरोइन, जाणून घ्या सध्या ती काय करतेय? By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 5:10 PM1 / 10 आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 2 / 10 लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते. 3 / 10 सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या. याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर अरमान या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली4 / 10 एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. 5 / 10 ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. 6 / 10 या मालिकेत काम करत असतानाच तिने लगान सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली. मात्र ग्रेसीला सिनेमात काम मिळेना. 7 / 10 त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. संतोषी माता मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली होते. २० जुलै १९८० रोजी नवी दिल्लीत ग्रेसीचा जन्म झाला. 8 / 10 तिचे वडिल स्वर्ण सिंग खासगी कंपनीत नोकरीला तर आई शिक्षिका होती. लेकीने इंजीनिअर व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अपघाताने ग्रेसी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. 9 / 10 छोट्या पडद्यापासून सुरु झालेला ग्रेसीचा प्रवास रुपेरी पडदा आणि मग पुन्हा रुपेरी पडद्यावरुन ती छोट्या पडद्याकडे परतली होती. 10 / 10ग्रेसी यशाच्या मार्गावर दिर्घ काळ चालू शकली नाही आणि बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक तिचे सिनेमे फ्लॉप व्हायला लागले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications