Mouni Roy : "मला वाटलं माझं आयुष्य आता संपलं..."; मौनी रॉयने 'तो' कठीण काळ सांगत मांडली व्यथा By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 3:13 PM1 / 11मौनी रॉयने मेहनतीमुळे छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही खूप लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.2 / 11आजही मौनीला तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप प्रेम मिळतं. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये कितीही हिट शो दिले असले तरी मौनीला खरी ओळख 'नागिन' या शोमधूनच मिळाली.3 / 11टीव्हीवर 'नागिन' म्हणून प्रसिद्ध असलेली मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. तिचे असंख्य चाहते आहेत. 4 / 11मौनीचे वेस्टर्न ते ट्रॅडिशनल असे विविध लुक्स लोकांना वेड लावतात. पण तुम्हाला माहीत आहे का की आता फिट दिसणाऱ्या मौनी रॉयचं वजन एकेकाळी ३० किलोने वाढलं होतं.5 / 11नागिन ही मालिका केल्यानंतर मौनी रॉय लाइमलाइटपासून दूर राहिली होती, कारण तिचं वजन इतकं वाढलं होतं की तिला वाटलं आता आपलं आयुष्यच संपलं आहे. 6 / 11बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, त्यावेळी तिचं वजन ३० किलोनं वाढले होतं आणि ती खूप अस्वस्थ झाली होती.7 / 11मौनी म्हणाली, 'सुमारे ७-८ वर्षांपूर्वी मी खूप आजारी पडले, त्यामुळेच त्या काळात मी खूप औषधं घेत होते. मला L4-L5, कॅल्शियम स्टोन्स आणि स्लिप्ड डिस्क डिजनरेशन होते. त्यामुळे मी ३ महिने अंथरुणाला खिळून होते.'8 / 11'त्या तीन महिन्यांत माझं वजन ३० किलोने वाढलं होतं. यावेळी मला कोणीही पाहिले नाही, मग मला वाटलं की माझं आयुष्य संपलं. यानंतर जेव्हा मी औषधं कमी केली तेव्हा माझं वजन कमी झालं.'9 / 11'वजन कमी करण्यासाठी मी बराच वेळ फक्त ज्यूस पीत राहिले, त्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायची. पण नंतर वाटलं की काहीतरी खावं. यानंतर मी हळूहळू खाऊ लागले. मग मी एका न्यूट्रिशनिस्टची मदत घेतली, ज्यांनी मला वजन कमी करण्यात खूप मदत केली.'10 / 11अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या अदांवर फिदा होतात. 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications