By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 08:00 IST
1 / 8प्रभास- बाहुबली फेम प्रभासचा एक दमदार सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे राधे-श्याम. या सिनेमात प्रभास व पूजा हेगडे लीड रोलमध्ये आहेत.2 / 8प्रभास - प्रभासचाच ‘प्रभास 21’ या सिनेमाचीही घोषणा झालीय. यात प्रभाससोबत दिसणार आहे ती बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण. दीपिकाने या सिनेमासाठी 21 कोटी इतकी भरभक्कम फी घेतल्याचे मानले जात आहे.3 / 8 यश- केजीएफ हा कन्नड सुपरस्टार यशचा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. बॉलिवूडमध्येही या सिनेमाने धूम केली होती. आता या सिनेमाचा सीक्वल ‘केजीएफ- चॅप्टर 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे यात यात संजय दत्त व रवीना टंडन हे बॉलिवूड स्टार्सही असल्याने प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.4 / 8ज्युनिअर एनटीआर व रामचरण तेजा - बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा आरआरआर या सिनेमाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. यात ज्युनिअर एनटीआर व रामचरण तेजा लीड भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटही यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षक क्रेजी झाले आहेत.5 / 8अल्लू अर्जुन - अल्लू अर्जुन सध्या पुष्पा या सिनेमात बिझी आहे. या सिनेमाचा हिंदी व्हर्जनद्वारे अल्लू अर्जुन बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करतोय.6 / 8विजय देवरकोंडा - ‘अर्जुन रेड्डी’ स्टार विजय देवरकोंडा अनन्या पांडेसोबत बॉलिवूडमध्ये जबरदस्त डेब्यू करतोय. या सिनेमाचे नाव आहे ‘फायटर’.7 / 8धनुष - धनुषचा ‘अतरंगी रे’ या सिनेमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यात धनुषसोबत सारा अली खान लीड रोलमध्ये आहे. अक्षय कुमार यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.8 / 8नागार्जुन - ब्रह्मास्त्र हा आगामी सिनेमा तसा रणबीर कपूर व आलिया भटचा सिनेमा आहे. पण यात साऊथ सुपरस्टार नागार्जुनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नागार्जुनला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.