By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:01 IST
1 / 7नव्या भोपाळ मध्ये असून तिथे फिरण्याचा खाण्यापिण्याचा आनंद घेत आहे. तिथले फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. 2 / 7अमिताभ बच्चनची नात म्हणजे मोठ्या हॉटेलमध्येच जात असेल तर असे नाहीए. नव्याने रस्त्याच्या कडेला छोट्याशा दुकानात चाट खातानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो बघुन ही किती साधी आहे असे युझर्स कमेंट करताना दिसत आहेत.3 / 7एवढेच नाही तर नव्याने एका साध्या घरात जाऊन हेअरकट सुद्धा केला आहे. एक वयस्कर महिला तिचा हेअरकट करत असतानाचा मिरर सेल्फी नव्याने शेअर केला आहे.4 / 7नव्या कमी वयात सुद्धा स्वत: बिझिनेस वुमन आहे. तिने 'आराहेल्थ' नावाने महिलांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणारे व्यासपीठ सुरु केले आहे.5 / 7तसेच 'प्रोजेक्ट नवेली' या नावाने तिने एक प्रकल्प सुरु केला आहे ज्यामध्ये लिंग समानतेविषयी जागरुकता निर्माण केली जाते. 6 / 7महिलांच्या प्रश्नांना धरुन नव्या एक पॉडकास्टही करते ज्यामध्ये तिची आज्जी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा या सहभागी होतात. 'व्हॉट द हेल' नव्या नावाने हे पॉडकास्ट आहे.7 / 7नव्या बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार की नाही हे अजुन तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र तिचे इतर स्टारकिड्स सोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अनेकदा ती बॉलिवुडच्या पार्ट्यांमध्ये सुद्धा दिसते.