IN PICS : नवाज बदलला, तशी लाईफस्टाइलही बदलली! वर्षाला कमावतो इतके कोटी!! By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 9:18 AM1 / 10केवळ आणि केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला आज कोण ओळखत नाही. (Nawazuddin Siddiqui Net Worth 2021, Income, Cars, Assets, Lifestyle)2 / 10शूल आणि सरफरोश या सिनेमातून नवाजने (Nawazuddin Siddiqui) करिअरची सुरुवात केली. पण या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी लहान होती की, लोकांनी त्याला नोटही केले नाही.3 / 10पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.4 / 10नवाजुद्दीन आज इंडस्ट्रीचे मोठे नाव आहे. 2021 साली त्याचे नेटवर्थ 13 मिलियन म्हणजेच 96 कोटी रूपये आहे.5 / 10caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन प्रत्येक महिन्याला 1 कोटींपेक्षा अधिकची कमाई करतो.6 / 10या हिशोबाने वर्षभरात तो 12 ते 13 कोटींची कमाई करतो.7 / 10काही वर्षांपूर्वी नवाजने मुंबईतील वर्सोवा भागात एक घर खरेदी केले होते. आज त्या घराची किंमत 12.8 कोटी रूपये आहे.8 / 10नवाजला गाड्यांचीही आवड आहेत. त्याच्या ताफ्यात Mercedes Benz, BMW, Audi अशा अलिशान गाड्या आहेत.9 / 10चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.10 / 10गावातील घरी वर्षातून एकदा तो नक्की जातो़ शेतात कामही करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications