Join us  

एकेकाळी वॉचमन, लूकसाठी लोकांनी उडवली खिल्ली; आज आहे सुपरस्टार, कोट्यवधींमध्ये नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:47 AM

1 / 10
भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अशाच एका अभिनेत्याबाबत जाणून घेऊया, ज्याने चित्रपटांमध्ये नाव कमावण्याआधी वॉचमन म्हणून काम केलं. तसेच त्याच्या लूकची देखील खिल्लीही उडवली जायची.
2 / 10
आता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनचा जन्म मुस्फरनगरमध्ये झाला. शिक्षण घेतल्यानंतर काही काळ केमिस्ट म्हणून काम केलं. पण त्याला अभिनयाची आवड होती.
3 / 10
अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी तो दिल्लीला आला. दिल्लीत राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला होता की, त्याने वॉचमनचं काम केलं आहे.
4 / 10
थोडे पैसे मिळवण्यासाठी कोथिंबीरही विकली. नवाजुद्दीन म्हणाला होता, 'आर्थिकदृष्ट्या माझी परिस्थिती ठीक नव्हती. मी माझ्या मित्रांकडून पैसे उधार घ्यायचो आणि दोन दिवसात परत करण्याचे वचन द्यायचो. नंतर दुसऱ्याकडून कर्ज घेऊन पहिल्या व्यक्तीचे पैसे परत करायचो.'
5 / 10
'चार लोकांसोबत फ्लॅटमध्ये राहायचो. दिल्लीत टिकून राहण्यासाठी त्याने अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. कधी मी वॉचमन म्हणून काम केलं तर कधी कोथिंबीर विकली. मी अभिनयाच्या कार्यशाळाही आयोजित केल्या.'
6 / 10
अभिनेत्याने पुढे खुलासा केला की त्याच्या लूकमुळे त्याला अनेक रिजेक्शनचा सामना करावा. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, नवाजुद्दीनने खुलासा केला की जेव्हा तो एनएसडीमध्ये बेरोजगार होता.
7 / 10
खडतर संघर्षांचा सामना केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी अखेर मोठा स्टार झाला. तो किक, बजरंगी भाईजान, सरफरोश आणि अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग आहे.
8 / 10
नवाजुद्दीन नेहमीच आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करत असतो. अभिनेता एका चित्रपटातून दहा कोटी रुपये कमावतो. त्याची एकूण नेटवर्थ ९६ कोटींच्या आसपास आहे.
9 / 10
नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत एक आलिशान बंगला आहे ज्याची किंमत १२ कोटींपेक्षा जास्त आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटांशिवाय एका ब्रँड शूटसाठी देखील तो एक कोटी रुपये चार्ज करतो. त्याचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड