संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 11:34 AM1 / 11दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकली जाणार आहे.2 / 11९ जून म्हणजे आज मोठ्या थाटात नयनतारा आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगली आहे.3 / 11सूत्रांच्या माहितीनुसार, महाबलीपुरम येथील शेरेटन गार्डमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगणार आहे. त्यामुळे सध्या नयनतारा आणि विघ्नेश यांच्या घरी लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळतं.4 / 11नयनतारा आणि विग्नेश यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते प्रोफेशनल लाइफपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली आहे.5 / 11विग्नेश आणि नयनतारा दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी असून या दोघांची एकूण संपत्ती किती ते पाहुयात.6 / 11सूत्रांच्या माहितीनुसार, नयनताराचा जन्म हवाई दलाच्या एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याच्या घरी झाला. तिची एकूण संपत्ती ७१ कोटी रुपये इतकी आहे.7 / 11नयनतारा एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. तसंच अनेक ब्रँडचं प्रमोशन, ब्रँड अम्बँसिडर असल्यामुळे तेथूनही तिची आर्थिक कमाई होते.8 / 11विग्नेश एक दिग्दर्शक आणि गीतकार आहे. त्याची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे.9 / 11विग्नेश एका चित्रपटासाठी १ ते ३ कोटी रुपये चार्ज करतो.10 / 11विग्नेश प्रसिद्ध गीतकार असल्यामुळे तो एका गाण्यासाठीदेखील ३ लाखांपर्यंत मानधन घेतो.11 / 11विग्नेश आणि नयनतारा यांची एकूण संपत्ती पाहिली तर दोघांची मिळून ते १२० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक असल्याचं पाहायला मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications