WHAT? नयनतारा-विग्नेश शिवनने 6 वर्षांपूर्वीचं केलं होतं लग्न! सरोगसीमुळे अडचणीत येताच केला खुलासा!! By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:47 AM 2022-10-16T11:47:57+5:30 2022-10-16T11:53:45+5:30
Nayanthara Vignesh Shivan Surrogacy Case: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा काही दिवसांआधीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि या आनंदाला जणू दृष्ट लागली.... दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा काही दिवसांआधीच सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि या आनंदाला जणू दृष्ट लागली.
होय, लग्नानंतर चारच महिन्यांनी सरोगसीद्वारे आई-बाबा बनणं नयनतारा व विग्नेश यांना महाग पडलं. कारण भारतीय सरोगसी कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रिया या दाम्पत्याने पाळल्या आहेत की नाही अशी शंका अनेकांनी उपस्थित केली.
यावर्षीच्या जानेवारीपासून सरोगसी कायदा हा बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे. त्यामुळे नयनतारा व विग्नेशचं प्रकरण प्रकरण तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहचलं. पण कपलने लगेच तामिळनाडू आरोग्य विभागाला एक प्रतिज्ञापत्र सोपवलं.
या प्रतिज्ञापत्रानुसार, नयनतारा व विग्नेश यांच्या लग्नाची सहा वर्षांपूर्वीच नोंदणी झाली आहे. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी कपलवर चौकशी बसवण्याचे संकेत दिले आणि कपलने लगेच लग्नाबद्दल हा खुलासा केला.
विद्यमान भारतीय कायद्यानुसार, लग्नानंतर पाच वर्षापर्यंत बाळ न झाल्यास दाम्पत्य सरोगसीची मदत घेऊ शकतात. त्यानुसार नयनतारा व विग्नेश यांनी 6 वर्षांपूर्वीच लग्न झाल्याचे कागदोपत्री पुरावे सादर केले.
नयनतारा आणि विग्नेशने 9 जून 2022 रोजी लग्न केलं. ‘नयन आणि मी, अम्मा आणि अप्पा झालो’, असं कॅप्शन देत विग्नेशने गत रविवारी सोशल मीडियावर जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट केले होते. त्याचसोबत या मुलांची नावंसुद्धा त्याने जाहीर केली होती.
2015 मध्ये या दोघांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी यावर्षी जून महिन्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.
नयनतारा व विग्नेश शिवन यांच्या आधी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी हा पर्याय निवडला आहे. फराह खान-शिरीष कुंदर, आमिर खान- किरण राव, शाहरुख खान-गौरी खान, करण जोहर, एकता कपूर, तुषार कपूर यांनी सरोगसीद्वारे मुलांनाजन्म दिला आहे.