ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 03:51 PM2024-11-30T15:51:09+5:302024-11-30T15:56:07+5:30

सेलेब्स कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींशी स्पर्धा करू शकत नाहीत, परंतु आयकर भरण्यात ते कमी नाहीत. भारतात अनेक बॉलिवूड आणि स्पोर्ट्स सेलेब्स आहेत जे करोडोंचा टॅक्स भरण्यासाठी ओळखले जातात. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, विराट कोहली, सलमान खान, शाहरुख खान या नावांचा यादीत समावेश आहे.

सेलेब्स कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींशी स्पर्धा करू शकत नाहीत, परंतु आयकर भरण्यात ते कमी नाहीत. भारतात अनेक बॉलिवूड आणि स्पोर्ट्स सेलेब्स आहेत जे करोडोंचा टॅक्स भरण्यासाठी ओळखले जातात. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, विराट कोहली, सलमान खान, शाहरुख खान या नावांचा यादीत समावेश आहे.

देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींनी गेल्या वर्षी केवळ ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. फॉर्च्युन इंडियाने या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली होती. या यादीत त्या सेलिब्रिटींचा समावेश आहे ज्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरला आहे.

अक्षय कुमारसाठी गेली काही वर्षे चांगली नव्हती. त्याचे सलग १० चित्रपट फ्लॉप झाले. यामुळे त्याच्या कमाईवरही परिणाम झाला, त्यामुळे त्यांच्या आयकर परताव्यावरही परिणाम झाला आहे. सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तो अनेकदा टॉपवर होता. मात्र यावेळी त्याचा टॅग कोणीतरी काढून घेतला.

सुपरस्टार शाहरुख खान ९२ कोटींचा कर भरून अव्वल स्थानावर राहिला. याचे कारण म्हणजे त्याने २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या चित्रपटांच्या यशाने शाहरुखने आपले हरवलेले स्टारडमही परत मिळवले.

शाहरुख खाननंतर पुढचे नाव तामिळ स्टार थलपथी विजयचे आहे. ५० वर्षीय विजयने २०२३-२४ मध्ये ८० कोटी रुपयांचा कर भरला. त्याच्या 'लिओ' या चित्रपटाने ६२३ कोटींची कमाई केली होती. त्याचा 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'ही ब्लॉकबस्टर ठरला.

या दोन सुपरस्टार्सनंतर सलमान खानचा नंबर लागतो, ज्याने ७५ कोटींचा टॅक्स भरला आहे. तर अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. बिग बींनी ७१ कोटींचा कर भरला. क्रिकेट विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आणि पाचव्या स्थानावर आहे.

अक्षय कुमार टॉप ५ मध्ये नाही. त्याच्या चित्रपटातील करिअरवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्याकडे आता अनेक मेगाबजेट चित्रपट असले तरी. फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरण्याच्या आधारावर बनवले गेले आहेत.