Join us

ना कोणता सिनेमा, ना मालिका, तरीदेखील कोटींची मालकीण आहे राखी सावंत, कशी करते इतकी कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:26 AM

1 / 8
राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन देखील म्हटले जाते. जी कधी तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. पण तिच्या संपत्तीचा आकडे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
2 / 8
राखी सावंतने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी राखीला फक्त ५० रुपये पगार मिळत होता.
3 / 8
परंतु अभिनेत्रीने कधीही हार मानली नाही आणि अनेक वर्षे कठोर संघर्ष केला. त्यानंतर फराह खानच्या 'मैं हूं ना' या चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. तिला या भूमिकेतही खूप पसंती मिळाली होती.
4 / 8
मात्र, हा चित्रपट राखीला अभिनयात यशस्वी करू शकला नाही. यानंतर राखीने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
राखीने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग केले. जो एक ब्लॉकबस्टर हिट देखील होता. एक काळ असा होता जेव्हा राखीला बी-टाऊनची टॉप आयटम गर्ल म्हटले जायचे. सगळ्यांनाच तिच्या अदांवर घायाळ झाले होते.
6 / 8
पण आता राखीने बरेच दिवस कोणतेही आयटम साँग केलेले नाही. तसेच ती कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत दिसली नाही, मात्र त्यानंतरही राखीच्या लक्झरी लाइफमध्ये कोणतीही घट झालेली नाही.
7 / 8
खरेतर, चित्रपटांव्यतिरिक्त राखी सावंत जाहिरात शूट, ब्रँड प्रमोशन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर पैसे कमावते.
8 / 8
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर राखी सावंतने आज ३७ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती स्वतःच्या बळावर कमावली आहे. मुंबई आणि दुबईमध्ये आलिशान घरांसोबतच राखी सावंत अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण आहे.
टॅग्स :राखी सावंत