Join us

Net worth: साधी राहणी असलेले KK होते कोटयवधींचे मालक; लाइव्ह कॉन्सर्टसाठी घ्यायचे लाखोंचं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 10:47 AM

1 / 13
प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (Singer KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
2 / 13
एका लाइव्ह कॉर्न्स्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे केके यांचं निधन झालं.
3 / 13
आजवरच्या कारकिर्दीमध्ये केके यांनी 2500 पेक्षा अधिक गाणी गायली होती. त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळी जादू होती. त्यामुळेच त्यांची गाणी ऐकल्यावर प्रत्येकाला जुने कॉलेजमधील वा मित्रांच्या कट्ट्यावरील दिवस आठवायचे.
4 / 13
हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगालीसह अन्य भाषांमध्ये गाणी गायत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं होतं.
5 / 13
केके यांचं निधन धक्कादायक असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्ट चर्चिल्या जात आहेत.
6 / 13
सध्या सोशल मीडियावर केके यांची लव्हस्टोरी आणि त्यांची एकूण प्रॉपर्टी यांची चर्चा होताना दिसते.
7 / 13
९०च्या काळापासून कलाविश्व दणाणून सोडणाऱ्या केके यांनी त्यांच्या कलागुणांच्या जोरावर बऱ्यापैकी संपत्ती गोळा केली होती.
8 / 13
चित्रपटातील गाण्यांना आवाज देण्यासोबतच ते लाइव्ह कॉन्सर्ट वा अन्य स्टेज शोदेखील करायचे. त्यामुळे हा एक त्यांच्या कमाईचा स्त्रोत होता.
9 / 13
मूळ दिल्लीतील असलेल्या केके एका गाण्यासाठी ५ ते ६ लाख रुपये मानधन घ्यायचे.
10 / 13
लाइव्ह कॉन्सर्ट असेल तर त्यासाठी ते १० ते १५ लाख रुपये फी घ्यायचे.
11 / 13
अत्यंत साधे राहणारे केके यांची एकूण संपत्ती १.५ मिलिअन डॉलर इतकी असल्याचं सांगण्यात येतं.
12 / 13
केके यांना लक्झरी कारची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांच्याकडे एकाहून एक सरस कारचं कलेक्शन होतं.
13 / 13
केके यांच्या पश्चात त्यांची पत्नी जॉथी, दोन मुलं आहे. कुन्नथ नकुल आणि कुन्नथ तमारा ही त्यांची दोन मुलं आहेत.
टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथबॉलिवूडसेलिब्रिटीसंगीत