Join us

मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू, वाटले पंखे आणि कूलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:57 IST

1 / 10
तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू या तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली आहे.
2 / 10
उन्हाने हैराण झालेल्या अनेक गरीब कुटुंबांना तापसीने पंखे आणि वॉटर कूलरचं वाटप केलं आहे. झोपडपट्टीमध्ये जाऊन तिने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला.
3 / 10
हेमकुंट फाउंडेशनसोबत तापसी पन्नूने हे चांगलं काम करण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर लोक तिला रिअल हिरो, देवदूत म्हणत आहेत.
4 / 10
अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लोकांना मदत करताना दिसत आहे.
5 / 10
'आपण अनेकदा पंखे किंवा कूलरसारख्या मूलभूत सुविधांना गृहीत धरतो, परंतु अनेक लोकांसाठी, विशेषतः या असह्य उष्णतेमध्ये वाऱ्याची हलकीशी झुळूक देखील एक वरदान आहे.'
6 / 10
'या उपक्रमाने मी प्रभावित झाले आहे आणि त्याचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. हे फक्त एखादी गोष्ट देण्याबद्दल नाही.'
7 / 10
'लोकांच्या पाठीशी उभं राहण्याबद्दल, त्यांच्या वेदना समजून घेण्याबद्दल आणि त्या कमी करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते करण्याबद्दल आहे' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
8 / 10
तापसीचे हे फोटो पाहून युजर्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. तापसी तू खरोखरच खरी हिरो आहेस, तू लोकांसाठी देवदूत बनून आली आहेस असं युजर्स म्हणत आहेत.
9 / 10
तापसी पन्नूच्या आगामी 'गांधारी'चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
10 / 10
टॅग्स :तापसी पन्नूबॉलिवूड