Join us

"11 महिने काम मिळालं नाही"; ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या खलनायकाने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 3:09 PM

1 / 11
शाहरुख खानचा 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याने दीपिका पादुकोणसोबत काम केलं होतं. 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये निकितिन धीर हा खलनायक होता, ज्याने थंगाबलीची भूमिका साकारून लक्ष वेधून घेतलं होतं.
2 / 11
निकितिन या चित्रपटाच्या यशानंतर रातोरात स्टार झाला. पण 'चेन्नई एक्स्प्रेस' नंतर जवळपास वर्षभर एकही ऑफर मिळाली नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान निकितिन धीरने त्याच्या वाईट काळाबद्दल सांगितलं.
3 / 11
'मला वाटलं की चेन्नई एक्सप्रेसनंतर माझं आयुष्य बदलेल. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही खूप उत्साही होतो. हा चित्रपट चांगली कामगिरी करेल हे आम्हाला माहीत होतं.'
4 / 11
'मला पूर्ण विश्वास होता की, प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या कारकिर्दीतील एक मोठा चित्रपट ठरेल आणि इतर चित्रपटांना मागे टाकेल. लोक मला ओळखू लागले आणि मला वाटलं इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर मी आता इथपर्यंत पोहोचलो आहे.'
5 / 11
'तुमचा विश्वास बसणार नाही की चेन्नई एक्स्प्रेस रिलीज झाल्यानंतर 11 महिन्यांनंतर माझ्याकडे काही काम नव्हतं. मी वाट पाहत राहिलो, पण मला कोणतीही ऑफर मिळाली नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतून नाही तर किमान दाक्षिणात्य चित्रपटातून तरी काम मिळेल, असे मला वाटले, पण तिथूनही काम मिळाले नाही.'
6 / 11
'प्रत्येकाने त्यादरम्यान मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तू मला काय सांगितले नाहीस? कुणीतरी म्हटलं की मी खूप उंच आहे. मी खूप गोरा आहे, मला अगदी कमी भीतीदायक दिस असं सांगितलं. अशी कारणं सांगितल्यावर मी हसलो आणि म्हणालो – ठीक आहे सर.'
7 / 11
निकितिन धीर याने सांगितलं की, 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या थंगाबलीच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्याने रिॲलिटी शो करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर त्यांच्यासाठी गोष्टी बदलू लागल्या. तो खऱ्या आयुष्यात कसा आहे हे लोकांना कळावे म्हणून त्याने 'खतरों के खिलाडी' केलं.
8 / 11
निकितिन धीर हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज धीर यांचा मुलगा आहे, ज्याने बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' चित्रपटात कर्णाची भूमिका केली होती. रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या वेबसीरिजमध्ये तो दिसला आहे.
9 / 11
आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत निकितिन धीरने 'दबंग 2', 'हाऊसफुल 3', 'रेडी', 'सूर्यवंशी', 'अँटीम द फायनल ट्रुथ', 'शेरशाह' आणि 'सर्कस' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
10 / 11
11 / 11
टॅग्स :बॉलिवूड