Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:07 PM1 / 12किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मध्ये 'फूल कुमारी'ची भूमिका साकारून नितांशी गोयल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेत्रीच्या निरागसपणा आणि साधेपणामुळे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. 2 / 12नितांशीने सांगितलं की, या चित्रपटानंतर तिचं आयुष्य खूप बदललं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिची अकरावीची परीक्षा सुरू होती. मात्र चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने ती परीक्षा देऊ शकली नाही.3 / 12नितांशीने त्यानंतर अकरावीची परीक्षा दिली. अभिनेत्री आता बारावीत आहे. तिने कॉमर्स स्ट्रीमची निवड केली आहे, पण तिचं स्वप्न अभिनेत्री बनण्याचं आहे.4 / 12Ranveer Allahbadia ला दिलेल्या लेटेस्ट मुलाखतीत नितांशीने तिचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप त्याग केला असल्याचं सांगितलं आहे.5 / 12'माझ्या स्वप्नांसाठी आई-वडिलांनी त्यांचं काम देखील सोडलं. तुमच्यावर तुमच्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम कोणीच कधीच करू शकत नाही.'6 / 12'माझे आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप गोष्टींचा त्याग केला आहे. मला अभिनय करायचा होता, टीव्हीवर स्वत:ला पाहायचं होतं.'7 / 12'मी हा विचार केल्यामुळेच माझ्या वडिलांनी नोएडामधील त्यांचा व्यवसाय सोडला. आता ते माझ्यासोबत इथे राहून जॉब करत आहेत.'8 / 12'आईनेही माझ्यासाठी तिची सरकारी नोकरी सोडली. ती आता इथे माझ्यासोबत राहते. मला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून दोघांनीही हे केलं. हेच खरे प्रेम असतं' असं नितांशीने म्हटलं आहे.9 / 12निताशीला विचारण्यात आलं की, चित्रपटानंतर तिला मुलांचं अटेन्शन मिळतं का? यावर ती म्हणाली की, - 'माझी आई माझ्याकडे तक्रार करत होती की मी तुझे ईमेल वाचते, कारण तू स्वतः वाचत नाहीस.'10 / 12'तुला ईमेलवर अनेक लव्हलेटर्स येत आहेत. अनेक महिलांना आता फुल कुमारीसारखी सून हवी असल्याचे व्हिडीओ शेअर होत आहेत. मी या सगळ्याचा आनंद घेत आहे.'11 / 12नितांशी सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. तिच्या अदांवर ते फिदा होतात. 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications