Join us

Nyasa Devgan : मुंबईत परतली काजोलची लेक 'न्यासा'; तिचा लुक पाहून नेटकरी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 5:25 PM

1 / 9
न्यासा देवगण ही अजय देवगण आणि काजोलची मोठी मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बदललेल्या लुकमुळे खूप ट्रोल होत आहे. काजोलच्या लेकीन प्लास्टीक सर्जरी केल्याची जोरदार चर्चा आहे
2 / 9
न्यासा नुकतीच दुबईवरुन मुंबईत परतली आहे. तिचे मुंबई विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहेत. व्हाईट टॉप आणि प्रिंटेड ट्रॅकपॅंट, हातात जॅकेट आणि बॅग अशा आऊटफिटमध्ये ती विमानतळावर दाखल झाली.
3 / 9
न्यासासोबत तिचा मित्र ओरहान म्हणजेच ओरी देखील होता. ओरी हा जान्हवी कपूर, अनन्या पांडे, नव्या नवेली या स्टार किड्सचा खूप जवळचा मित्र आहे. तो अनेक बॉलिवुड पार्ट्यांमध्ये आजकाल दिसतो.
4 / 9
ओरी आणि न्यासाने इतर मित्रांसोबत दुबईत न्यू इयर साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र न्यासाला बघून नेचटकऱ्यांनी ट्रोलिंगच सुरु केले.
5 / 9
न्यासाचा एकंदर सध्याचा अवचतार बघून नेटकऱ्यांनी अजय आणि काजोललाच निशाण्यावर धरले आहे. लेकीला नीट शिस्त लावता आली नाही का अशा शब्दात नेटकरी टीका करत आहेत.
6 / 9
‘हिने आपल्या आईबाबाची अब्रू पार धुळीस मिळवली,’ असं एका युजरने म्हटलं आहे. ‘ही 1 टक्काही तिच्या आईसारखी नाही,’असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
7 / 9
न्यासाचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळीही युझर्सने तिला खूप ट्रोल केले होते.
8 / 9
न्यासाला अनेकदा नशेत असल्यासारखे चालतानाही बघितले गेले होते. तिला कॅमेऱ्यासमेर धड चालता येत नव्हते. तिचा तोल जात होता. मित्रांन धरुन त्यांच्या मागे लपून ती गाडीत बसली तेव्हा तेव्हापासून ती ट्र्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
9 / 9
न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. त्यामुळे सध्या तिचा बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याचा कोणताच विचार नाही असे काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते.
टॅग्स :सोशल मीडियाट्रोलअजय देवगणकाजोल