एकेकाळी अनुष्का-दीपिकासाठी कॉफी ऑर्डर करायची, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 1:08 PM1 / 9बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या 'अमर सिंग चमकीला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांकडून कौतुक होत असलेल्या परिणीती चोप्राने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. 2 / 9त्यावेळी परिणितीने तिच्या जुन्या दिवसांचा उल्लेख केला आहे, जेव्हा ती YRF ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. परिणिती चोप्रा म्हणाली की तिने रणवीर सिंग आणि अनुष्का शर्माच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत.3 / 9परिणीती चोप्राची मुलाखत नुकतीच राज शमानी यांना त्यांच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली आहे. जिथे परिणिती म्हणाली की 'दिल बोले हडिप्पा, दीपिका पदुकोण-नील नितीन मुकेशच्या लफंगे परिंदे आणि अनुष्का शर्मा-शाहिद कपूरच्या बदमाश कंपनीसाठी मी राणीसाठी प्रमोशन केले होते. 4 / 9मी या सर्व कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली. इंटर्न म्हणून माझा शेवटचा चित्रपट बँड बाजा बारात होता.5 / 9परिणिती चोप्राने पुढे सांगितले की, 'ज्या पत्रकारांसाठी तिने YRF मध्ये इंटर्न असताना सेलिब्रिटींच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. ते आता तिची मुलाखत घेत आहे...' 6 / 9परिणीती चोप्राने यशराज फिल्म्समध्ये जवळपास दीड वर्षे काम केले होते. परिणीतीने मुलाखतीत सांगितले होते की, नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी तिला आदित्य चोप्राचा फोन आला आणि तो का कॉल करत आहे याचे तिला आश्चर्य वाटले.7 / 9परिणीती चोप्राने मुलाखतीत सांगितले की, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मासोबत तिची ऑडिशन टेप पाहिल्यानंतर आदित्य चोप्राने तिला तीन चित्रपटांची ऑफर दिली होती. 8 / 9त्यानंतर परिणीती चोप्राने 'इश्कजादे', 'हंसी तो फसी' आणि 'मेरी प्यारी बिंदू' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रभावित केले. एंटरटेनमेंट रिपोर्ट्सनुसार, परिणीती चोप्राने यशराज फिल्म्ससोबत ११ वर्षे काम केले आहे. 9 / 9परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमर सिंग चमकिलापूर्वी अक्षय कुमारसोबत मिशन रानीगंजमध्ये ती दिसली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications