'लग्नात नाचायचे किती पैसे घेशील?' युजरने विचारला खोचक प्रश्न; संतापलेली अभिनेत्री म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 11:47 AM1 / 8कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. त्यामुळे या सेलिब्रिटींना प्रेक्षकांच्या प्रेमासह अनेकदा ट्रोलिंगही सहन करावं लागतं.2 / 8सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरु आहे. मुद्दाम खोचक प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला या अभिनेत्रीने सडेतोड उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली आहे.3 / 8पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. यात अनेकदा ती तिच्या जीवनातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. 4 / 8अलिकडेच आयशाने तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर अनेकांनी कमेंटचा पाऊसही पाडला. मात्र, एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली आहे.5 / 8लग्न समारंभात डान्स करण्याचे किती पैसे घेणार? असा प्रश्न एका नेटकऱ्याने आयशाला विचारला. त्यावर आयशा प्रचंड संतापली.6 / 8'मी कोणाचाही लग्नात असं नाचत नाही. मी फक्त मित्र ,परिवाराच्याच लग्नात डान्स करुन आनंद व्यक्त करते. आणि, डान्स करण्यासाठी मी कोणतेही पैसे घेत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखं सर्वसाधारण आयुष्य जगते. आम्ही सुद्धा मित्रमैत्रिणींच्या लग्नात हजेरी लावतो. तो सोहळा एन्जॉय करतो', असं आयशा म्हणाली.7 / 8पुढे ती म्हणते, 'बिझी शेड्युलमधून वेळ काढत डान्स प्रॅक्टीस करणं काही सोपं काम नाही. आणि, हो प्रत्येक कामाचे पैसे घेतले जात नाहीत. काही अशाही गोष्टी असतात ज्या तुम्हाला मनापासून आनंद देतात.'8 / 8दरम्यान, आयशाचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिने मलायका अरोराच्या 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर ताल धरला आहे. या गाण्यात तिने मलायकाला कॉपी केल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications