तुम्ही स्वतः देशाची वाट लावताय!; बॉयफ्रेंडनं असं म्हणून उडवली पाकिस्तानची टिंगल, अभिनेत्रीनं मोडला साखरपुडा By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:27 AM1 / 9पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासीर ( Zoya Nasir) यानं बॉयफ्रेंड ख्रिस्टियन बॅटजमैन याच्या एका ट्विटवरून साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. 2 / 9ख्रिस्टियन हा जर्मन ब्लॉगर आहे आणि त्यानं इस्राईल व फिलिस्तीन यांच्या वादात उडी मारताना पाकिस्तानचे टिंगल उडवणारं ट्विट केलं होतं. 3 / 9त्यानं या ट्विटमध्ये पाकिस्तानला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हटलं होतं आणि हिच गोष्ट झोयाला आवडली नाही. तिनं तातडीनं ख्रिस्टियन सोबत असलेले सर्व संबंध तोडले. 4 / 9ख्रिस्टिटनच्या त्या ट्विटवर खुप हंगामा झाला होता. त्यानं लिहिलं होतं की,''यावेळी फक्त प्रार्थना करून काहीच होणार नाही. दुसऱ्यांसाठी शोक व्यक्त करणं बंद करा, एकीकडे तुम्हीच लोकं आपल्या देशाची वाट लावत आहात. तुम्ही स्वतःचा समाज व लोकांनी मदत करू शकत नाही आहात.'' 5 / 9 त्यानंतर झोयानं संताप व्यक्त करताना सोशल मीडियावर पोस्ट लिहून ख्रिस्टियनसोबतचे सर्व संबंध तोडे. तिनं लिहिलं की,''माझी संस्कृती, माझा देश आणि माझ्या लोकांप्रती ख्रिस्टियनचं मत अचानक बदललं. माझ्या धर्माप्रती त्यानं असंवेदनशीलता दाखवली आहे. त्यामुळे मला हा कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. 6 / 9''धार्मिक आणि सामाजिक सीमा असतात आणि त्यांचं उल्लंघन करायला नको. त्यामुळेच मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांप्रती सन्मान, विनम्रता याचे पालन नेहमी व्हायला हवं. जगात चाललेल्या या भावनात्मक संकटाचा मुकाबला करण्याची मला ताकद मिळो, ही मी अल्लाहकडे दुआ करते. ख्रिस्टियनला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,''असंही तिनं लिहिलं. 7 / 98 / 9ख्रिस्टियननंही त्याला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, माझ्या विधानाची तोडमोड केली गेली. मला भविष्यात सुंदर पाकिस्तान पाहायचे आहे आणि त्यामुळेच मी अशी टीका केली. 9 / 9तो पुढे म्हणाला, मी कोणत्याच धर्माची टिंगल नाही उडवली. इस्लाम हा शांतीचे प्रतिक आहे, परंतु मी जेव्हा सोशल मीडियावर पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया वाचतो तेव्हा त्यात शांती अजिबात दिसत नाही. त्यात तिरस्कार आणि हिंसा दिसते. कोणाच्या विधानाची तोडमोड करून तिरस्कार पसरवणं सोपं असतं. मी नेहमी फिलीस्तीनच्या सोबत आहे.' आणखी वाचा Subscribe to Notifications