By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:38 IST
1 / 9क्रिकेट आणि बॉलिवूडचं खूप जवळचं नातं आहे. त्यामुळेच अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. 2 / 9बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदी यांच्याही अफेअरच्या चर्चा होत्या. 3 / 9९०च्या दशकात सोनाली आणि शाहीद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, त्या दोघांनीही याबाबत मौन बाळगणं पसंत केलं होतं. 4 / 9आता इतक्या वर्षांनी शाहीद आफ्रिदीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य केलं. 5 / 9शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी मीडिया आर्टस काऊंसिल कराचीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला सोनाली बेंद्रेबरोबरच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं. 6 / 9'सोनाली बेंद्रेला शाहीद आवडायचा असं आम्ही ऐकलं आहे. हे खरं होतं की तुमच्यात फक्त मैत्री होती?' असा प्रश्न शाहीदला विचारला गेला. 7 / 9यावर उत्तर देत तो म्हणाला, 'आता तर तुम्ही मला आजोबा म्हणालात आणि आता तुम्ही माझे किस्से सांगताय. डिलीट करून टाका रे आता...आम्ही मोठे झाले आहोत'. 8 / 9सोनालीने २००२ साली गोल्डी बहलशी लग्न करत संसार थाटला. त्यांना एक मुलगा आहे. 9 / 9तर शाहीद आफ्रिदीने नादीया आफ्रिदी यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांना चार मुलं असून त्यांना नातवंडंही आहेत.