‘पापा कहते हैं’चा चार्मिंग हिरो आठवतोय का? आजही दिसतो तितकाच हँडसम अन् स्टायलिश By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:40 PM1 / 9'पापा कहते हैं' हा चित्रपट ९० च्या काळात विशेष गाजला होता. या चित्रपटात मयुरी कांगो आणि युगल हंसराज ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती.2 / 9हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २१- २२ वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, या चित्रपटातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.3 / 9या चित्रपटातील जुगल हंसराजने त्याकाळी तरुणींच्या मनावर अक्षरश: राज्य केलं. त्या काळात तरुणींमध्ये त्याची तुफान क्रेझ निर्माण झाली होती. 4 / 9जुगलने अभिनेता असण्यासोबतच मॉडल, निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे सध्या हा अभिनेता काय करतो?, कसा दिसतो? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.5 / 9जुगलने १९८३ मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली. मासूम या चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.6 / 9१९९४ मध्ये आ गले लग जा मध्ये त्याने अभिनेता म्हणून काम केलं. त्यानंतर मोहब्बतें, कभी खुशी कभी गम, सलाम नमस्ते यांसाराख्या चित्रपटात तो झळकला.7 / 9जुगलचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.8 / 9वाढत्या वयाच्या खुणा जुगलच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या आहेत. मात्र, त्यातही तो पुर्वीइतकाच स्टायलिश दिसतो.9 / 9आजही जुगलच्या फोटोवर तरुणी कमेंटचा पाऊस पाडतात. जुगलचं लग्न झालं असून जॅस्मिन ढिल्लो हंसराज असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications