पश्मिना रोशनची बॉलिवूडमध्ये पदार्पणाआधीच क्रेझ, हृतिकची चुलत बहीण बघा कशी दिसते! By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 6:30 PM1 / 7बॉलिवूडचा हँडसम अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन (Pashmina Roshan) सध्या चर्चेत आहे. पश्मिना अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. डेब्यूआधीच तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्यावर फिदा असतात.2 / 7पश्मिना राजेश रोशन यांची मुलगी आहे. राजेश रोशन हे राकेश रोशन म्हणजे हृतिकच्या वडिलांचे धाकटे भाऊ आहेत.राजेश रोशन हे म्यूझिक डायरेक्टर आणि कंपोझर आहेत. ७० च्या दशकात त्यांनी बरंच काम केलं होतं.3 / 7पश्मिना २८ वर्षांची असून ती लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारित आहे. 'इश्क विश्क' या गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये ती दिसणार आहे. 'इश्क विश्क रिबाऊंड' असं सिनेमाचं नाव आहे. जून महिन्यात सिनेमा रिलीज होणार असून तिच्या अपोझिट रोहित सराफ आणि जिबरान खान हे अभिनेते आहेत.4 / 7पश्मिनाचा जन्म १९९५ साली मुंबईतच झाला. तिचं शिक्षणही याच शहरात झालं. पश्मिना थिएटर आर्टिस्ट आहे. शाळेत असल्यापासूनच तिने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे तिने लहानपणापासूनच अनेक थिएटर्समध्ये सहभाग घेतला आहे.5 / 7पश्मिना उत्तम डान्सरही आहे. तिने दिग्गज कोरियोग्राफर सरोज खान यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. शिवाय तिचा चुलत भाऊ अभिनेता हृतिक तर नृत्यात माहिर आहेच.6 / 7पश्मिना रोशन कुटुंबात सर्वात जास्त लाडकी आहे. हृतिक रोशनसोबतही तिचे फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत. हृतिकचं बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. तसंच ती त्याच्याकडून अभिनयासंदर्भात टिप्सही घेत असते. 7 / 7पश्मिना सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. पदार्पणाआधीच तिचे इन्स्टाग्रामवर १ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या सौंदर्यावर चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications