Join us

PHOTOS : शुभमंगल सावधान...! रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:35 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.
2 / 10
या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
3 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने तयार केलेले कपडे परिधान केले होते.
4 / 10
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात रकुल खूपच गोड दिसत होती. त्यावर तिने छान ज्वेलरी घातली. या लूकमध्ये रकुल सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे जॅकीने रकुलला मॅचिंग क्रिम कलरची शेरवानी परिधान केली.
5 / 10
रकुलने लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'तू कायमचा माझा आहेस'. यासोबतच तिने लग्नाची तारीख (21-02-2024) लिहली. तसेच #abdonobhagna-ni असा हॅशटॅगही तिनं दिला.
6 / 10
लग्नानंतर पहिल्यांदाच रकुल-जॅकी एकत्र मीडियासमोर आले आणि फोटो क्लिक केले. यासोबत दोघांच्या कुटुंबीयांनी पापराझींना मिठाई वाटली.
7 / 10
चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल आज लग्नबंधनात अडकले.
8 / 10
चाहत्यांनी आणि सेलिब्रेटिंनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
9 / 10
यावेळी दोघेही अगदी आनंदात दिसून आले.
10 / 10
लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टॅग्स :रकुल प्रीत सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडजॅकी भगनानीलग्नसोशल मीडियागोवा