Join us

इशकजादे! मलायका अरोराच्या प्रेमात जगाला विसरला अर्जुन कपूर, असे फुलले प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 3:09 PM

1 / 10
निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा ही ओळख अर्जुन कपूरने कधीच पुसली. आज अर्जुनने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात अर्जुनच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफची चर्चाच जास्त रंगली.
2 / 10
अर्जुन आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. गेल्या दोन वर्षांपासून अर्जुन मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
3 / 10
अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली.
4 / 10
लॉकडाऊनआधी अर्जुन व मलायका सर्रास एकमेकांसोबत दिसत.
5 / 10
आपले नाते लपवण्याचा सुरुवातीला दोघांनीही बराच खटाटोप केला. पण योग्य वेळ येताच दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली.
6 / 10
या रिलेशनशिपमुळे मलायका व अर्जुन दोघेही ट्रोल झालेत. पण ट्रोल करणा-यांकडे दुर्लक्ष करत दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली.
7 / 10
मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.
8 / 10
अद्याप या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. पण अर्जुन व मलायका लग्नासाठी एकदम तयार आहेत, हे मात्र खरे.
9 / 10
चित्रपटात येण्याआधी अर्जुनचे वजन 140 किलो होते. त्यामुळे हिरो बनण्याचे तर सोडा पण आपण काहीच करू शकणार नाही, असे अर्जुनला वाटायचे.
10 / 10
सलमान खानने अर्जुनला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आणि अर्जुनने प्रचंड मेहनतीने वजन कमी करून ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा