Join us

Poonam Pandey :बापरे! अनेक महिन्यांपासून खोट्या मृत्यूची तयारी करत होती पूनम पांडे; 'असा' झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 2:19 PM

1 / 12
अभिनेत्री पूनम पांडेचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याच्या खोट्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एक अभिनेत्री तिच्या मृत्यूबाबत अशी पब्लिसिटी कशी काय करू शकते, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
2 / 12
सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी पूनमने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. तिला माहीत होतं की असं केल्याने तिला लोकांकडून ट्रोल केलं जाणार आहेत. पण तिने याचा विचार केला नाही.
3 / 12
आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पूनम अनेक महिन्यांपासून तिच्या खोट्या मृत्यूची तयारी करत होती. पण हे करण्यामागचा तिचा उद्देश सर्व्हायकल कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं हा नव्हता.
4 / 12
अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. मात्र 24 तासांनंतर तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि ती जिवंत असल्याचं सांगितलं.
5 / 12
पूनमने आपल्या चाहत्यांना तिच्या www.poonampandeyisalive.com या नवीन वेबसाइटबद्दलही सांगितलं. पूनमचा दावा आहे की तिने #DeathToCervicalCancer बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी ही वेबसाइट सुरू केली आहे.
6 / 12
अभिनेत्री म्हणाली की अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सर्व्हायकल कॅन्सरची लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. म्हणजेच एकीकडे बजेटमध्ये सर्व्हायकल कॅन्सरची लस मोफत देण्याची चर्चा होती, तर दुसरीकडे पूनमने तिच्या मृत्यूच्या बातमीद्वारे सर्व्हायकल कॅन्सर मोहीम सुरू केली. पण तसं नाही.
7 / 12
डोमेन रेकॉर्डवरून पूनमची वेबसाइट 18 जुलै 2023 रोजी रजिस्टर झाली होती. यावरून ती अनेक महिन्यांपासून खोट्या मृत्यूच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं. त्यामुळे याचा सर्व्हायकल कॅन्सरशी काहीही संबंध नाही.
8 / 12
32 वर्षीय पूनम पांडेने 'नशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या 11 वर्षांत सोशल मीडियावर एकाही आजाराचा उल्लेख केलेला नाही. तसेच तिने कोणत्याही आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती केली नाही. त्यामुळेच सर्व्हायकल कॅन्सर ही खूप दूरची गोष्ट आहे.
9 / 12
अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री पूनम पांडेविरोधात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सर्व्हायकल कॅन्सरच्या नावाखाली जनतेची फसवणूक आणि देशाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
10 / 12
पूनम पांडे 2020 मध्ये प्रकाशझोतात आली, जेव्हा तिने तिचा मित्र आणि लिव्ह-इन पार्टनर सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं. पण लग्नाच्या दहा दिवसांनंतर अभिनेत्रीने त्याच्याविरुद्ध शोषण आणि मारहाणीची पोलिस तक्रार दाखल केली. सॅमला गोव्यात अटक करण्यात आली. यानंतर सॅम बॉम्बेची जामिनावर सुटका करण्यात आली.
11 / 12
12 / 12
टॅग्स :पूनम पांडे