Join us

इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेली पूनम पांडे, होती आलिशान गाड्यांची आवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 1:17 PM

1 / 10
प्रसिद्ध आणि वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या अचानक निधनामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ३२व्या वर्षी सर्वाइकल कॅन्सरने तिचे निधन झाले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
2 / 10
या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनम पांडे आपल्या मागे कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेली आहे.
3 / 10
अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पूनम पांडे हिने रिॲलिटी शो आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रातही खूप नाव कमावले. तिच्या उत्पन्नाचा स्रोतही चित्रपट आणि टीव्हीवरूनच होता.
4 / 10
याशिवाय पूनमने मॅगझिनसाठी फोटोशूट करूनही बक्कळ कमाई केली होती. तिला आलिशान कारचीही आवड होती आणि ती मुंबईच्या पॉश भागात राहात होती. पूनमने तयार केलेल्या ॲपमधूनही भरपूर कमाई होते.
5 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडेची संपत्ती जवळपास ५२ कोटी रुपये आहे. पूनमने चित्रपटांमधूनही चांगली कमाई केली आहे.
6 / 10
नशा, लव की पॅशन, मालिनी अँड कंपनी, आ गया हीरो आणि द जर्नी ऑफ कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले होते आणि करोडो रुपये कमावले. याशिवाय, तिने टोटल नादनिया आणि प्यार मोहब्बत साश या टेलिव्हिजन शोमध्ये देखील काम केले, जिथे तिला चांगली रक्कम मिळाली.
7 / 10
पूनम पांडेने देशातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता आणि यासाठी तिला चांगली रक्कमही मिळाली होती. तिने भोजपुरी चित्रपट अदालत आणि अल्ट बालाजीच्या शो लॉकअपमध्येही काम केले होते, पूनमला दर आठवड्याला सुमारे ३ लाख रुपये मानधन मिळत होते.
8 / 10
पूनमचे ​​स्वतःचे ॲप देखील आहे, ज्याचे सुमारे ३२ लाख पेड सबस्क्रायबर आहेत आणि सध्या पूनम या ॲपमधून सर्वाधिक कमाई करते.
9 / 10
पूनम पांडे मुंबईतील वांद्रे भागात एका चार मजली इमारतीत राहत होती. तिच्याकडे बीएमडब्ल्यू कारही आहे.
10 / 10
पूनम पांडेसोबत तिचा व्यवसाय सांभाळण्यासाठी २७ क्रू मेंबर्सही राहत होते. याशिवाय पूनमच्या घरात तीन शेफ राहत होते, ते तिच्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवत असत. एकूणच, पूनम पांडेकडे करोडोंची संपत्ती आहे आणि ती लक्झरी लाइफ जगत होती.
टॅग्स :पूनम पांडे