Join us  

‘पुष्पा’च्या बंपर सक्सेसनंतर ‘या’ सात सिनेमांत झळकणार अल्लू अर्जुन, पाहा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 6:11 PM

1 / 8
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं 300 कोटींवर कमाई केली. साहजिकच या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमांकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. ‘पुष्पा’नंतर एकापाठोपाठ एक सात सिनेमांत अल्लू अर्जुन झळकणार आहे.
2 / 8
‘पुष्पा’च्या बंपर सक्सेसनंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या याच चित्रपटाचा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा- द रूल’ या सिनेमात बिझी झाला आहे. मार्च महिन्यात या चित्रपटाचं शूटींग सुरू होत आहे. ‘पुष्पा 2’ यावर्षी अखेरपर्यंत थिएटरमध्ये झळकण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे.
3 / 8
‘पुष्पा- द रूल’नंतर अल्लू अर्जुनचा आणखी एक बिग बजेट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे आयकन. यात पूजा हेगडे व कृती शेट्टी लीड रोलमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.
4 / 8
‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनने मानधनात वाढ केली आहे. ताज्या चर्चेनुसार, अल्लू अर्जुनने एक नवा सिनेमा साईन केला आहे आणि यासाठी तो 100 कोटी रूपये मानधन घेणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शक एटली दिग्दर्शित करणार असून लायका प्रॉडक्शन याचा निर्माता आहे. अद्याप या सिनेमाची घोषणा झालेली नाही. पण चर्चा जोरात आहे.
5 / 8
दिग्दर्शक बोयापति श्रीनु यांच्या सिनेमातही अल्लू अर्जुनची वर्णी लागल्याची चर्चा आहे. ‘सरनायडू’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर अल्लू अर्जुन व बोयापति श्रीनु दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. आयकन हा सिनेमा हातावेगळा करताच अल्लू अर्जुन या सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे.
6 / 8
‘केजीएफ’ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबतही अल्लू अर्जुन एक सिनेमा करणार असल्याची खबर आहे. प्रशांत नील सध्या ‘केजीएफ 2’मध्ये बिझी आहेत. त्यांचा ‘सालार’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या दोन सिनेमानंतर प्रशांत नील अल्लू अर्जुनसोबत नवा चित्रपट सुरू करणार आहेत.
7 / 8
मिर्ची, श्रीमानंथुडू, भारत ऐने नेनू असे हिट सिनेमे दिल्यानंतर दिग्दर्शक कोरतल्ला शिवा हे अल्लू अर्जुनसोबत सिनेमा करणार आहेत. तूर्तास या चित्रपटावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय.
8 / 8
अल्लू अर्जुननने दिग्दर्शक मुरूगदास यांच्यासोबतही हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. या चित्रपटावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय. तूर्तास या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याची माहिती आहे.
टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood