बाबो! Prabhasच्या वजनामुळे वाढलं दिग्दर्शकाचं टेन्शन, शूटींग थांबलं ना राव!! By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 8:00 AM1 / 10‘बाहुबली’ फेम प्रभासच्या बॅक टू बॅक दोन फ्लॉप सिनेमांनी फॅन्सला प्रचंड निराश केलं आहे. प्रभास लवकरच दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘सालार’ या चित्रपटात झळकणार आहे. यात प्रभास जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसणार आहे. पण एक अडचण आहे.2 / 10होय, ‘सालार’ या चित्रपटाचं शूटींग अचानक थांबवण्यात आल्याचं कळतंय आणि याला कारण प्रभास आहे. होय, प्रभासमुळे अचानक चित्रपटाचं शूटींग थांबवावं लागलं आहे.3 / 10आता कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कारण आहे प्रभासचं वाढलेलं वजन. होय, ‘सालार’ साठी लीन लुकची गरज आहे. पण प्रभासचं वजन काही केल्या कमी होत नसल्यानं दिग्दर्शकही चिंतेत आहेत.4 / 10अलीकडे रिलीज झालेल्या ‘राधेश्याम’ या चित्रपटात प्रभास लीन लुकमध्ये दिसला होता. पण प्रमोशनदरम्यान त्याचं अचानक वाढलेलं वजन बघून सगळ्यांना धक्का बसला होता. चर्चा खरी मानाल तर राधेश्याममध्ये सीजीआय टेक्निकच्या मदतीने प्रभासला चांगल्या शेपमध्ये दाखवलं गेलं होतं.5 / 10पण ‘सालार’च्या दिग्दर्शकांना तडजोड मान्य नाही. प्रभासला फीट दाखवण्यासाठी ती तंत्रज्ञानाची मदत घेण्यास नाखुश आहेत. प्रभासने लवकरात लवकर वजन घटवावं, हीच त्यांची मुख्य अट आहे.6 / 10एकंदर काय तर वजन कमी झाल्याशिवाय शूटींग करण्यास नील यांनी नकार दिला आहे. आता प्रभास आपलं वजन कसं आणि किती घटवतो, ते बघूच.7 / 10ग्रेट आंध्राच्या रिपोर्टनुसार, प्रभास दीर्घकाळापासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त आहे. डॉक्टरांनी त्याला गुडघ्याची सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. या सर्जरीनंतर त्याला 3-4 महिने विश्रांत करावी लागणार आहे. तूर्तास तरी इतका मोठा ब्रेक घेणं प्रभाससाठी शक्य नाही. त्यामुळे तो गुडघ्याचं दुखणं सहन करतोय आणि त्याचं वजन वाढण्यामागंही हेच कारण आहे.8 / 10गुडघ्याच्या दुखण्यामुळे प्रभास पूर्ण वर्कआऊट करू शकत नाही. अनेक एक्सरसाइज त्याला स्किप कराव्या लागतात. त्यामुळे त्याचं वजन कमी करण्यात त्याला अडचणी येत आहेत.9 / 10‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभासच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला. या चित्रपटासाठी बॉडी व मस्कुलर फिजीक बनवण्याच्या नादात प्रभासने स्वत:ला प्रचंड स्ट्रेच केलं. यानंतर वजन कमी करण्याची वेळ आली तेव्हा या दुखण्यानं डोकं वर काढलं. 10 / 10 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभास खाण्याचा शौकीन आहे. अशास्थितीत वजन नियंत्रित ठेवणं त्याच्यासाठी कठीण काम आहे. त्याचा झोपेचा पॅटर्नही अनिश्चित आहे. तो रात्री उशीरा झोपतो आणि दुपारी उठतो. साहजिकच वजन सारखं वाढतंय आणि वाढतं वजन प्रभाससाठी डोकेदुखी ठरू लागलीये. आणखी वाचा Subscribe to Notifications