Join us

मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 6:00 AM

1 / 9
फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टार्स आपल्या नावामुळे ओळखले जातात तर अनेक आपल्या भूमिकांमुळे. अशाच अनेक यादगार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस आहे.
2 / 9
प्रकाश राज यांनी 1994 साली ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान तरूणीवर प्रकाश राज यांचा जीव जडला. ती कोण तर पोनी वर्मा. होय, पोनी एक कोरिओग्राफर आहे.
3 / 9
पोनी प्रकाश राज यांच्या एका सिनेमात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. प्रकाश राज पहिल्याच नजरेत पोनीच्या प्रेमात पडले.
4 / 9
पुढे काळासोबत ही लव्हस्टोरी बहरत गेली आणि प्रकाश राज यांनी पोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
5 / 9
पण प्रकाश राज यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या. त्यांच्या संमतीशिवाय हे लग्न शक्य नव्हते. अखेर प्रकाश राज यांनी या लग्नासाठी मुलींची परवानगी घेण्याचे ठरवले.
6 / 9
प्रकाश राज यांच्या मुलींचा सुरुवातीला या नात्यासाठी विरोध होता. पण पोनी यांना भेटल्यानंतर त्यांनी या लग्नासाठी होकार दिला.
7 / 9
पोनी आणि प्रकाश राज यांच्यात 12वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या लग्नासाठी विरोध या कारणामुळे देखील होत होता.
8 / 9
पोनी आणि प्रकाश यांनी 2010 मध्ये लग्न केले.
9 / 9
पोनी आणि प्रकाश यांना एका मुलगा असून त्याचे नाव वेदांत आहे. त्याचा जन्म 2015 मध्ये झाला. प्रकाश राज यांनी आपल्या करिअरमध्ये 2000 वर अधिक साऊथ चित्रपटांत काम केले. 1998 साली ‘हिटलर’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर वॉन्टेड, सिंघम, दबंग, भाग मिल्खा भाग यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले.
टॅग्स :प्रकाश राज