OMG! इतक्या वर्षांत इतकी बदलली प्रिती झिंटा, फोटो पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:53 AM1 / 8३१ जानेवारी १९७५ ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. 2 / 8 मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केले. लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. 3 / 8लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रितीला अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. 4 / 8प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली5 / 8 १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली.6 / 8प्रितीच्या अफेअरची चर्चाही खूप रंगली. नेस वाडियासोबतचे प्रितीचे रिलेशनशिप जगजाहिर होते. ती आणि नेस वाडिया दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण पुढे हे रिलेशनशिप वेगळ्याच वळणावर गेले.तिने वाडियावर शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. 7 / 8आयपीएल टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य क्रिकेटर युवराज सिंहसोबतही प्रितीचे नाव जोडले गेले. दोघेही मॅचदरम्यान आणि अनेकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच होती. 8 / 8२०१६ मध्ये प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. आणखी वाचा Subscribe to Notifications