Join us  

प्रियंका-निकचा स्वप्नातला बंगला! १५० कोटींच्या आलिशान घरात सुरूय सुखाचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 3:58 PM

1 / 10
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 10
प्रियंका आणि निक यांचा लॉस एंजेलिसमध्ये आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत सुमारे 150 कोटी आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
प्रियांकाचं 150 कोटींचं अमेरिकेतील घर कसं असेल असा प्रश्न कायम चाहत्यांना पडतो. त्यामुळेच तिचं घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.
4 / 10
२० हजार स्क्वेअर फुटांच्या या घरात ७ बेडरूम आहेत. फनांडो व्हॅलीचे सुंदर दृश्य या घरातून दिसते.
5 / 10
सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचं संपूर्ण घराची झलक दिसून येते.
6 / 10
प्रियांकाचं घर अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट निवडताना, डिझाइन करताना बारकाईने विचार करण्यात आला आहे.
7 / 10
२०१८ मध्ये निकसोबत लग्न केल्यापासून प्रियांका या घरात राहते.
8 / 10
या घरात मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. या पूलमधील अनेक फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत.
9 / 10
प्रियांकाचं घर अत्यंत लक्झरी असल्याचं दिसून येतं.
10 / 10
प्रियांका अनेकदा तिच्या घरातले फोटो शेअर करत असते.
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास