Join us

प्रियंका चोप्राचा बिकिनी लूक, मालती मेरीचा क्युटनेस; 'देसी गर्ल'चे न्यू इयर Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:38 IST

1 / 8
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत अमेरिकेतच स्थायिक आहे. प्रियंका बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही सक्रीय आहे.
2 / 8
प्रियंका नेहमीच कुटुंबासोबत व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
3 / 8
प्रियंकाने समुद्रकिनारी न्यू इयर साजरा केला. यावेळी तिने निक जोनाससोबत बिकिनीत पोज दिली. लाल बिकिनी, लाल हॅट आणि गॉगल यामध्ये ती अगदी फॉरेनरच दिसत आहे. तर निक जोनास ब्लॅक कॅज्युअल आऊटफिटमध्ये स्मार्ट दिसतोय.
4 / 8
गुलाबी बिकिनीतही तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पाण्यात झोपलेली आहे. खूप सुंदररित्या हा फोटो क्लिक करण्यात आला आहे.
5 / 8
मालती मेरीसोबतचाही गोड फोटो शेअर केला आहे. मालतीला जवळ घेऊन ती निककडे पाहत असतानाचा हा सुंदर फोटो आहे.
6 / 8
याशिवाय समुद्रात वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद लुटतानाचा फोटो प्रियंकाने शेअर केला आहे. वॉटर जेटमध्ये बसून तिने पोज दिली आहे.
7 / 8
तर आणखी एका फोटोत ती व्हाईट शर्टमध्ये दिसत आहे. समोर समुद्राचा सुंदर नजारा आहे. मालती मेरीला मांडीवर घेऊन ती आरामात बसलेली आहे.
8 / 8
अशा प्रकारे प्रियंकाने टर्क्स अँड कैसास या नॉर्थ अमेरिकेतली एका प्रांतात यंदा नवीन वर्षाचं स्वागत केलं. तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासहॉलिवूडसोशल मीडियानववर्षाचे स्वागत