Join us

IN PICS : तर निक माझा जीव घेईल..., प्रियंका चोप्रा असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:52 PM

1 / 8
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने 2018 साली अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतं.
2 / 8
सध्या चर्चा आहे ती प्रियंकांच्या एका विधानाची. होय, तर निक माझा जीव घेईन, असं प्रियंका एका ताज्या मुलाखतीत म्हणाली. पण नेमकं का व कशासाठी?
3 / 8
तर प्रियंकाने नुकतीच ‘व्होग’ या मॅगझिनला मुलाखत दिली. तुला भेट म्हणून मिळालेला सर्वात आवडता दागिना कोणता? असा प्रश्न प्रियंकाला यावेळी करण्यात आला.
4 / 8
माझी साखरपुड्याची अंगठी हा माझा सर्वात आवडता दागिना आहे, असं मी म्हणाले नाही तर निक माझा जीव घेईल, असं गमती गमतीत प्रियंका यावेळी म्हणाली.
5 / 8
माझ्या साखरपुड्याच्या अंगठीशी माझ्या खूप भावना जुळलेल्या आहेत. ही अंगठी माझ्यासाठी अनमोल दागिना आहे. माझा आवडता दागिना आहे, असंही पुढे ती म्हणाली.
6 / 8
प्रियंका व निकचा साखरपुडा झाला होता, तेव्हा या एंगेजमेंट रिंगची बरीच चर्चा झाली होती. या अंगठीची किंमत सुमारे 2 लाख डॉलर होती.
7 / 8
ही महागडी अंगठी खरेदी करण्यासाठी निकने त्याचे एक स्टोअर विकले होते, असे म्हणतात. आता इतकी अनमोल अंगठी प्रियंकासाठी खास असणारच.
8 / 8
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर प्रियंकाकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. लवकरच ती द मॅट्रिक्स आणि टेक्स्ट फॉर यू या हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. सिटाडेल या वेबसीरिजचे शूटींगही तिने पूर्ण केले आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास