Priyanka Chopra: "... म्हणून मी आई होऊ शकत नव्हते", सरोगसीनंतर लोकांचे टोमणे ऐकून प्रियंका चोप्रा भावूक! By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 9:41 AM1 / 9अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लेक मालती मॅरीसोबत मदरहुड एन्जॉय करतेय. अलिकडेच प्रियंकांने पहिल्यांदा मुलीसोबत फोटोशूट केलं आणि सरोगसीवर मोकळेपणे भाष्य केलं. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 9मुलाखतीदरम्यान प्रियंकाने सांगितले की तिने सरोगसीच्या मार्गाची का निवड केली आणि यावरुन तिला अनेकांनी टोमणेसुद्धा मारले. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 9प्रियंका चोप्राने वेग मॅगझीनसाठी लेक मालती मॅरीसोबत फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट प्रियंका आणि मालती रेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतायेत. या फोटोंमध्ये देखील प्रियंकाने मालतीचा चेहरा दाखवलेला नाही. (फोटो इन्स्टाग्राम) 4 / 9मुलाखतीदरम्यान मालतीच्या जन्माबाबत प्रियंका म्हणाली, 'मालतीचा जन्म झाला तेव्हा ती ऑपरेशन रूममध्ये होती. ती माझ्या हातापेक्षा लहान होती. मी पाहिलं की आयसीयूव्हीमध्ये नर्स काय करतात, त्या देवापेक्षा कमी नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 9यानंतर प्रियंकाने सरोगसी निवडण्यामागचे कारणही सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, मला मेडिकल प्रोब्लेम आहे आणि त्यामुळेच मी स्वतः बाळाला जन्म देऊ शकत नाही.(फोटो इन्स्टाग्राम) 6 / 9पुढे ती म्हणाली, 'मला आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत, त्यामुळे बाळाचा विचार करताना सरोगसी हाच पर्याय माझ्यापुढे होता. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 9 मी स्वतःला भाग्यवान समजतो की सरोगसीव्दारे मी आई झाले आणि सरोगेटचाही आभारी आहे ज्यांनी सहा महिने आमच्या बाळाची काळजी घेतली. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 9प्रियांकाने सांगितले की, मुलीच्या जन्मानंतर तिच्यावर गर्भ भाड्याने घेणे आणि सरोगेसीच्या माध्यमातून 'रेडीमेड बाळा' मिळवण्याचा आरोप झाला होता. (फोटो इन्स्टाग्राम) 9 / 9जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिला अशा लोकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत का? यावर ती म्हणाली, 'लोक जेव्हा माझ्याबद्दल बोलतात तेव्हा माझ्या भावना लपवण्यासाठी स्वत:ला आणखी खंबीर बनवते.' प्रियांका चोप्राने 2018 मध्ये निक जोनाससोबत लग्न केले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी त्यांची मुलगी मालतीचे या जगात स्वागत केले.(फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications