पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 07:00 IST
1 / 13गेल्या कित्येक वर्षांमध्ये समाजातील अनेक रुढी-परंपरा यांच्या व्याख्या बदलताना दिसत आहेत. या बदलामागे कलाविश्वाचाही मोठा सहभाग आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी समाजाच्या विरोधात जाऊन काही पावलं उचलली आणि तेव्हापासून एक नवा ट्रेंड सुरु झाला. त्यामुळेच रुढी-परंपरांना छेद देणारे कलाकार कोणते ते पाहुयात.2 / 13कतरिना कैफ - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचं काही दिवसांपूर्वीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न झालं. मात्र, या लग्नात कतरिनाने जुनी चालत आलेली परंपरा बदलून टाकली.3 / 13हिंदू पद्धतीने लग्नाच्या मंडपात नववधू फुलांच्या चादरी खालून येते. ही चादर तिच्या भावांनी पकडली असते. मात्र, कतरिनाच्या लग्नात ही चादर तिच्या बहिणींनी पकडली होती. माझ्या बहिणींनी माझी कायम साथ दिली त्यामुळे यावेळी पण त्याच सोबत असतील असं म्हणत तिने हा मान बहिणींना दिला.4 / 13नीना गुप्ता- बॉलिवूडमधील बिंधास्त आणि स्पष्टवक्तेपणे मत मांडणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. एकेकाळी नीना गुप्ता लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. त्यावेळी त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता.5 / 13नीना गुप्ता यांनी समाजाचा विरोध झुगारुन न केवळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्या. तर, त्यांनी सिंगल मदर होऊन त्यांच्या लेकीचा सांभाळ केला.6 / 13दिया मिर्झा - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने २०२१ मध्ये बिझनेसमन वैभ रेखीसोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे कन्यादान आणि पाठवणी (बिदाई) या पद्घतींना विशेष महत्त्व आहे. मात्र, या दोन्ही पद्धती तिने नाकारल्या.7 / 13दियाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या पद्धती झाल्याच नाहीत. इतकंच नाही तर तिचं लग्नही एका महिला पंडितने करुन दिलं.8 / 13मंदिरा बेदी - २०२१ या वर्षात मंदिराच्या पतीचं राज कौशलचं निधन झालं. परंतु, यावेळीदेखील मंदिरा नेहमीप्रमाणे स्ट्राँग असल्याचं पाहायला मिळालं.9 / 13साधारणपणे व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मुलगा वा भाऊ अंत्यसंस्काराच्या विधी पूर्ण करतो. मात्र, मंदिराने स्वत: तिच्या नवऱ्याला मुखाग्नी दिला.10 / 13प्रियांका चोप्रा - अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. यात तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीही चर्चा होताना दिसते. 11 / 13प्रियांकाने तिच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची जीवनसाथी म्हणून निवड केली. निक प्रियांकापेक्षा वयाने लहान आहे. या लग्नानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.12 / 13सुहासिनी मुळे - अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या सुहासिनी मुळे यांनी एक वेगळाच आदर्श सगळ्यांसमोर दिला.13 / 13 सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्न केलं. त्यापूर्वी त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होत्या.