PHOTOS : ‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 2:05 PM1 / 9अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत लग्न करून सेटल झालीये. आता वेळ आहे ती भावाला सेटल करण्याची. आम्ही बोलतोय ते अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा बद्दल.2 / 9कर्णेश शर्मा सध्या एका अभिनेत्रीला डेट करतोय आणि दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री कोण तर तृप्ती डिमरी.3 / 9 बुलबुल या चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कर्णेशसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत तिने आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे.4 / 9तृप्तीने कर्णेशच्या होम प्रॉडक्शनच्या ‘बुलबुल’ या सिनेमात लीड भूमिका साकारली होती. दोघेही या सिनेमाच्या सेटवर भेटले आणि इथेच दोघांची मैत्री फुलली आणि ही मैत्री प्रेमात बदलली.5 / 9 अनुष्काने एकप्रकारे कधीच या नात्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. अनुष्काने अलीकडे कर्णेश व तृप्तीचा एका फोटो शेअर करत, मिस यू म्हटलं होतं. तृप्ती अनुष्काला चांगलीच आवडल्याचेही म्हटलं जातंय.6 / 9डेहरादूनची तृप्ती 2017 मध्ये श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉयज’मध्ये दिसली होती. यानंतर ती मुंबईत सेटल झालीये. 7 / 9काही महिन्यांपूर्वी तिचा ‘लैला मजनू’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेता अविनाश तिवारी लीड रोलमध्ये होता.8 / 9नुकताच तिचा ‘qala’ हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही कर्णेशच्या प्रॉडक्शन कंपनीने प्रोड्यूस केला होता.9 / 9लवकरच तृप्ती रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात रणबीर व रश्मिका मंदाना लीड रोलमध्ये आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications