'जाने बलमा घोडे पे क्यू सवार है' गाणारी गायिका कोण ? जिच्या आवाजाने सर्वांनाच घातली आहे भूरळ By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 7:00 PM1 / 8नेटफ्लिक्सवर नुकत्याच रिलीज झालेल्या 'कला' या सिनेमातील 'घोडे पे सवार' गाणे सध्या सर्वांचेच आवडीचे गाणे बनले आहे. गाण्यात अभिनय करणारी अनुष्का शर्मा असो किंवा कला मधील अभिनेत्री तृप्ती डिमरी असो दोघींनी लक्ष वेधलं आहे. मात्र हे गाणं गाणारा गोड आवाज कोणाचा हा प्रश्न पडला असेल.2 / 8जाने बलमा घोडे पे क्यू सवार है हे गाणं ऐकताच हा किती छान गाणं आहे आणि किती गोड आवाज आहे अशीच प्रतिक्रिया येते. कला सिनेमातील घोडे पे सवार हे गाणं गाणारी गायिका आहे सिरीशा भागवतुला. कोण आहे ही सिरीशा माहितीए का3 / 8तर सिरीशा इंडियन आयडॉल मधून नावारुपाला आली आहे. इंडियन आयडॉल १२ मध्ये ती अतिशय ताकदीची स्पर्धक होती. तिच्या आवाजाचे तर सगळेच ताहते झाले होते. 4 / 8सिरीशा विशाखापट्टणम आंध्रप्रदेशची आहे. सिरीशाच्या गाण्याने खुद्द ए आर रहमान यांनाही भुरळ घातली. त्यांनी देखील तिचे कौतुक केले आहे. सिरीशा गोल्ड मेडल विजेती देखील आहे.5 / 8केवळ ए आर रहमानच नाही तर संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांनाही तिचा आवाज प्रचंड आवडला आणि त्यांनी तिला कला सिनेमात गाण्याची संधी दिली.6 / 8सिरीशानेही या संधीचं सोनंच केलं. घोडे पे सवार हे गाणं तिने अगदी अप्रतिमरित्या गायलं आहे. इतकं की सर्वच सध्या या गाण्याच्या प्रेमात पडले आहेत.7 / 8सिरीशा तेलगु परिवारातील आहे. तिने तमिळ आणि तेलगू मध्ये याआधी गाणं गायलं आहे. तिला कुटुंबाकडूनच गाण्याचा वारसा लाभला आहे. तिचे आजोबा कवी आणि गीतकार आहेत. ते तेलगू भाषेत लिहितात आणि सिरीशा तिच्या बहिणीसोबत गाते. 8 / 8घोडे पे सवार या गाण्यासाठी सिरीशाचे प्रचंड कौतुक होत आहे. सध्या या गाण्याची सगळीकडेच धूम सुरु आहे. इन्स्टाग्रामवर तर गाण्यावर रिल्स बनत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications