Join us

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट; दुसऱ्या लग्नामुळे आलेली चर्चेत, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:24 IST

1 / 8
सेलिब्रिटींचे सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. त्याला नेटकऱ्यांची सुद्धा पसंती मिळते.
2 / 8
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमुळे माहिरा प्रसिद्धीझोतात आली आहे.
3 / 8
माहिरा खान ही पाकिस्तानमधील लोकप्रिय व सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
4 / 8
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'रईस' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
5 / 8
या चित्रपटात तिने शाहरूखच्या नायिकेची भूमिका साकारली होती. माहिरा अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.
6 / 8
बॉलिवू़ड पदार्पणावेळी माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत काही फोटो लीक झाले होते. ज्यामध्ये दोघंही धूम्रपान करताना दिसत होते. या फोटोंमुळे चांगलीच खळबळ माजली होती.
7 / 8
माहिरा २ ऑक्टोबर २०२४ मध्ये पुन्हा लग्नबंधनात अडकली. तिने सलीम करीमसोबत लग्न केलं. दोघंही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
8 / 8
माहिरा खानचं हे दुसरं लग्न असून पहिल्या लग्नातून तिला १४ वर्षांचा एक मुलगाही आहे.
टॅग्स :माहिरा खानबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल फोटोज्