किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2024 9:06 AM1 / 10अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट हे कायम चर्चेत असतात. या जोडप्याची 2 वर्षांची मुलगी राहा कपू (Raha Kapoor ) तर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधते.2 / 10 तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राहा जिथे जाते, तिथे तिच्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसते.3 / 10 तिचे क्युट एक्सप्रेशन्स नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आताही राहाचे काही फोटो व्हायरल होत आहेत.4 / 10रणबीर कपूर हा फुटबॉल या खेळाचा प्रचंड चाहता आहे. तो एका फुटबॉल संघाचा मालक आहे. काल 30 नोव्हेंबर रोजी राहा ही आलिया आणि रणबीरसोबत मुंबईत एका फुटबॉल सामन्यादरम्यान दिसली. 5 / 10राहाला पाहताच क्षणी सर्वचजण आलियाचा लेकीवर फिदा झाले. या सामन्यात ती आकर्षणाचेा केंद्र बनली होती. आपल्या वडिलांसारखी निळ्या रंगाची जर्सी घातलेली राहा खूप क्यूट दिसत होती.6 / 10राहाच्या जर्सीच्या मागील बाजूस 6 हा आकडा लिहिला होता, ज्यावर राहा असेही लिहिले होते. राहाच्या निळ्या जर्सीतील 6 हा आकडा हा खूप खास आहे. कारण ही राहाची जन्मतारीख आहे. 7 / 10आलियाने आपल्या चिमुकलीला कडेवर उचलून घेतल्याचं दिसलं. राहाच्या क्युट एक्सप्रेशन्सनं सर्वांचं लक्ष वेधलं.8 / 10राहाच्या हातात फुग्याचा पाइप होता. यावेळी तिचा खेळकर अंदाज पाहायला मिळाला. तर आलियाने पांढरा टँक टॉप, काळा शर्ट आणि राखाडी पँट घातली होती.9 / 10राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. सध्या ती दोन वर्षांची आहे. आतापासूनच तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे.10 / 10 राहा सध्या कपूर आणि भट कुटुंबात सर्वांचीच लाडकी आहे. यासोबतच नेटकऱ्यांसह बॉलीवूडमधल्या इतर स्टार्सची सुद्धा खूपच लाडकी आहे आणखी वाचा Subscribe to Notifications